सोलापूर

सैराटची हिरोईन आणि हास्य जत्रेतील लोकप्रिय कलाकार सोलापुरात दाखल होणार…. पण तारीख काय?

सैराटची हिरोईन आणि हास्य जत्रेतील लोकप्रिय कलाकार सोलापुरात दाखल होणार…. पण तारीख काय?

सोलापूर (प्रतिनिधी):- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला जिल्ह्यात चांगलीच गती मिळाल्याने करसंकलनात लक्षणीय वाढ झाली असून आतापर्यंत जवळपास ७० टक्के करसंकलन पूर्ण झाले आहे. ५० टक्के सवलतीचा लाभ मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी घेतला असून, चालू महिनाअखेरीस करसंकलन ९० टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास उपकार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) सुर्यकांत भुजबळ यांनी व्यक्त केला.

या अभियानाला शासनाकडूनही विशेष पाठबळ मिळत असून, धार्मिक व सामाजिक माध्यमातून जनजागृतीसाठी जिल्ह्यात ह. भ. प. शुकलाताई पाटील यांच्या दोन कीर्तनांचे कार्यक्रम घेतलो आहोत यामुळे ग्रामीण भागात कर भरण्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, या अभियानाच्या अनुषंगाने एक आनंदाची बाब म्हणजे येणाऱ्या ८ तारखेला मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू तसेच ‘हास्य जत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब या जिल्ह्यातील पाच गावांना भेटी देणार आहेत. या भेटींमधून अभियानांतर्गत झालेल्या विकासकामांची पाहणी करण्यात येणार असून नागरिकांना करसंकलन व विकासकामांबाबत प्रोत्साहित केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात उत्साहाचे व सकारात्मक वातावरण निर्माण होणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

तसेच शासनाकडून जिल्ह्यासाठी विशेष फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफरची टीम उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही टीम पुढील १५ ते २० दिवस जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन अभियानांतर्गत झालेल्या कामांचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यात झालेल्या कामांचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहितीही भुजबळ यांनी दिली.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे करसंकलनासोबतच विकासकामांना गती मिळत असून, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सहभागातून जिल्ह्यात सकारात्मक बदल घडताना दिसत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!