सोलापूर

राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी माहिती पुस्तिका सोलापूर महानगरपालिका संकेतस्थळावर उपलब्ध

राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी माहिती पुस्तिका सोलापूर महानगरपालिका संकेतस्थळावर उपलब्ध

सोलापूर (प्रतिनीधी):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने, निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्व राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांसाठी माहिती पुस्तिका (Information Booklet) सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सदर माहिती पुस्तिकेमध्ये नामनिर्देशन अर्ज सादर करणे, अर्ज छाननी, उमेदवारी मागे घेणे, प्रचार कालावधी, आचारसंहिता, खर्च मर्यादा, मतदान प्रक्रिया, मतमोजणी तसेच निवडणुकीशी संबंधित विविध नियम व मार्गदर्शक सूचना सविस्तरपणे नमूद करण्यात आलेल्या आहेत. तसेच उमेदवारांना आवश्यक असणारे विविध नमुने (Forms) देखील या पुस्तिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, उमेदवार व त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांनी सदर माहिती पुस्तिकेचे तसेच त्यामधील आवश्यक नमुन्यांचे काळजीपूर्वक अवलोकन करून निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

सदर माहिती पुस्तिका सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर (Website) उपलब्ध असून, उमेदवारांनी कोणतीही अडचण अथवा त्रुटी टाळण्यासाठी निवडणूक संबंधित सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!