महाराष्ट्र

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी स्वीकारला कार्यभार

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी स्वीकारला कार्यभार

मुंबई (प्रतिनिधी):- महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला असून, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांनी आज विधिवतपणे पदभार स्वीकारला. त्यांच्या या ऐतिहासिक नियुक्तीमुळे राज्यातील महिला नेतृत्वाला नवी ओळख आणि बळ मिळाल्याची भावना राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करत, सर्वसामान्य नागरिक, महिला, शेतकरी, युवक आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

राज्याच्या प्रगतीसाठी पारदर्शक, संवेदनशील आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत व अभिनंदन केले. त्यांच्या नेतृत्वामुळे महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळेल, तसेच राज्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचा राजकीय व सामाजिक प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार असून, महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत हा एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!