सोलापूर

सोलापुरात मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप… अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जबरदस्त दणका!

सोलापुरात मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप… अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जबरदस्त दणका!

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूरच्या राजकारणात मध्यरात्री घडलेल्या एका मोठ्या घडामोडीने खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापुरात भारतीय जनता पार्टीने मोठा राजकीय दणका दिला आहे. सोलापूर राष्ट्रवादीचे बडे प्रस्थ मानले जाणारे नगरसेवक किसन जाधव आणि नेते नागेश गायकवाड यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला.

या प्रवेशामुळे सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हा प्रवेश मध्यरात्री बालाजी सरोवर हॉटेलमध्ये पार पडल्याने, या घटनेने राजकीय वर्तुळात अधिकच चर्चा रंगली आहे.

किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या भाजप प्रवेशामागे शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांची निर्णायक भूमिका असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या प्रयत्नातूनच हा प्रवेश निश्चित झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यामुळे शहर मध्य भागात भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.

या मध्यरात्री झालेल्या प्रवेशावेळी आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, विनायक कोंड्याल, प्रथमेश कोठे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. भाजपच्या या आक्रमक राजकीय खेळीमुळे सोलापुरातील निवडणूक लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

आता प्रश्न एकच आहे – हा फक्त ट्रेलर आहे की सोलापुरात अजून मोठा ‘राजकीय स्फोट’ होणार आहे?

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!