सोलापूर

श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेटीचे आयोजन 

सोलापूर (प्रतिनिधी) विध्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्र म्हणजे काय याची माहिती होण्यासाठी सिद्धनाथ साखर कारखाना तेरे तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर येथे विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते सदर क्षेत्र भेटीमध्ये शिवशंकर कोरशेट्टी टेक्निशियन यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष साखर कारखाना दाखवून साखर तयार होण्याची प्रक्रिया कोणती? साखर कशाप्रकारे तयार केली जाते? साखर तयार करताना कोणकोणत्या कच्चामाल लागतो? साखर तयार झाल्यानंतर साखरचे वेगवेगळ्या कणानुसार त्याचे वर्गीकरण कसे केले जाते? साखर कारखान्यांमध्ये विद्युत ऊर्जा कशी निर्मिती केली जाते? तयार झालेल्या विद्युत ऊर्जेचे वापर कोणकोणत्या ठिकाणी कसे केले जाते? इत्यादी सर्व बाबींची विद्यार्थ्यांना सखोल माहिती देण्यात आली आणि प्रत्यक्ष साखर कारखान्याचे प्रशासन व बाजारामध्ये साखर कशी आयात केली जाते. अशी सखोल माहिती या क्षेत्रभेटीद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष देण्यात आली

याविषयी विद्यार्थ्यांची प्रतिसाद घेण्यात आले

या क्षेत्रभेटीसाठी प्राचार्य श्री. डी. डी. गाजरे यांचे मार्गदर्शन लाभले. ही क्षेत्रभेट यशस्वी होण्यासाठी अनिल फराडे, रोहित होटकर, अतुल बुनगे, राणी राऊत आदींनी परिश्रम घेतले. आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री विपिन ठोकळ, उपाध्यक्ष श्री सचिन ठोकळ, संस्थेचे सचिव श्री भिकाजी गाजरे, संचालिका सौ शिल्पा ठोकळ यांनी शाळेचे कौतुक केले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!