सोलापूर

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा अलर्ट; वारकऱ्यांच्या सेवेसाठी सोलापूर जिल्हा परिषद सज्ज

कासेगाव येथे नियोजन बैठकीत आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा; प्रत्येक पालखीसोबत ALS रुग्णवाहिकेची सूचना

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा अलर्ट; वारकऱ्यांच्या सेवेसाठी सोलापूर जिल्हा परिषद सज्ज

कासेगाव येथे नियोजन बैठकीत आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा; प्रत्येक पालखीसोबत ALS रुग्णवाहिकेची सूचना

कासेगाव (पंढरपूर) : आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांना वेळेत, दर्जेदार आणि अखंडित आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले असून संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती भाजप सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली. या पार्श्वभूमीवर कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित नियोजन व आढावा बैठकीत विविध आरोग्यविषयक उपाययोजनांचा सखोल आढावा घेण्यात आला.

 

सभापती चेतनसिंह केदार सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वारी मार्गावरील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला. यामध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती, औषधांचा पुरेसा साठा, रुग्णवाहिका व्यवस्था, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, चरण सेवा, मुख्यमंत्री वारकरी सुविधा उपचार केंद्र, मुख्यमंत्री वारकरी निवारा उपचार केंद्र, मुख्यमंत्री आरोग्य रथ, आरोग्यदूतांची नियुक्ती, मेडिसिन किटचे वितरण तसेच उष्माघात आणि संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी विशेष उपाययोजनांची माहिती घेण्यात आली.

वारीदरम्यान वारकऱ्यांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रत्येक पालखीसोबत अत्याधुनिक ALS (Advanced Life Support) रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली. तसेच स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय ठेवण्यावर भर देण्यात आला.

 

यावेळी बोलताना सभापती चेतनसिंह केदार सावंत म्हणाले, “आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि सेवाभावाचे प्रतीक आहे. लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी ही प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सेवा मिळावी, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत असून सर्व यंत्रणांनी सतर्क राहून जबाबदारीने काम करावे,” असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीस आरोग्य समितीचे सदस्य व्यंकटराव भालके, नागनाथ भोसले, शोभाताई खटकाळे, सविताताई कोकाटे, संगीताताई दुधाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!