सोलापूर

परिचर कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवक पदोन्नतीचा मार्ग मोकळा करा; जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे निवेदन

शासनाच्या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी; पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा

परिचर कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवक पदोन्नतीचा मार्ग मोकळा करा; जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे निवेदन

शासनाच्या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी; पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा

सोलापूर : जिल्हा परिषदेतील चतुर्थश्रेणी परिचर संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवक (पुरुष) पदावर पदोन्नती देण्याची प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, शाखा सोलापूर यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार जिल्हा परिषदेतील परिचर संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवक (पुरुष) संवर्गात पदोन्नती देण्याचा मार्ग खुला झाला आहे. मात्र, या अधिसूचनेची अंमलबजावणी अद्यापही अनेक ठिकाणी प्रलंबित असल्याचे युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.

निवेदनामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेमधील पात्र परिचर कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करून त्यांना नियमांनुसार पदोन्नती देण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. पदोन्नतीमुळे कर्मचाऱ्यांना सेवाविषयक प्रगतीची संधी मिळणार असून आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासही मदत होणार असल्याचे युनियनने नमूद केले आहे.

यावेळी युनियनचे सचिव त्रिमूर्ती राऊत, कार्याध्यक्ष विशाल घोगरे, मुख्य सल्लागार श्रीशैल देशमुख, खलील जमादार, वसंत काळे, कृष्णा आधटराव, तुकाराम कांबळे, अंबादास कांबळे, रोहित शिंदे, बसवेश्वर डमडमे, जाधव, सरवदे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पात्र कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा आणि शासनाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा युनियनच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!