सत्कारातून समाजसेवेचा आदर्श; इंद्रजीत भाऊ पवार यांच्या आवाहनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 11 हजार वह्यांचे संकलन
हार-तुरे, शाल आणि पुष्पगुच्छांना फाटा; विद्यार्थी व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त साहित्य भेट देण्याचा अभिनव उपक्रम
सत्कारातून समाजसेवेचा आदर्श; इंद्रजीत भाऊ पवार यांच्या आवाहनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 11 हजार वह्यांचे संकलन
हार-तुरे, शाल आणि पुष्पगुच्छांना फाटा; विद्यार्थी व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त साहित्य भेट देण्याचा अभिनव उपक्रम
सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2026 मध्ये बीबीदारफळ गटातून विजयी झाल्यानंतर माननीय इंद्रजीत (भाऊ) पवार, उपाध्यक्ष तथा सभापती, अर्थ व बांधकाम समिती, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या सत्कारासाठी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने गर्दी केली. मात्र, पारंपरिक सत्कार पद्धतीला वेगळे वळण देत इंद्रजीत भाऊ पवार यांनी समाजोपयोगी उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला आहे.

सत्कारासाठी हार, पुष्पगुच्छ, शाल किंवा इतर औपचारिक भेटवस्तू आणण्याऐवजी शालेय विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना उपयोगी पडेल असे साहित्य आणण्याचे आवाहन त्यांनी मतदार व नागरिकांना केले होते. त्यांच्या या सामाजिक जाणिवेतून केलेल्या आवाहनाला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वह्या, शैक्षणिक साहित्य तसेच शेतीसाठी उपयुक्त साहित्य भेट स्वरूपात दिले. या उपक्रमातून तब्बल 11 हजार वह्यांचे संकलन करण्यात आले असून शेतकऱ्यांसाठीही विविध प्रकारचे साहित्य जमा झाले आहे.
सत्कार समारंभातून प्राप्त झालेले हे सर्व साहित्य सोमवार, दि. 15 जून 2026 रोजी बीबीदारफळ गटातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना तसेच गरजू लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळणार असून शेतकऱ्यांनाही थेट लाभ होणार आहे.
समाजहिताची जाणीव ठेवून राबविण्यात आलेला हा उपक्रम शिक्षण आणि कृषी क्षेत्राला बळकटी देणारा ठरत असून लोकप्रतिनिधींनी सामाजिक बांधिलकी जपत जनतेसाठी काम करण्याचा आदर्शही यातून निर्माण झाला आहे. नागरिकांमध्येही सामाजिक उत्तरदायित्वाची भावना दृढ करण्यास या उपक्रमाची मोठी मदत होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
“आपला विश्वास… हाच माझा संकल्प!” या ब्रीदवाक्याला साजेसा हा उपक्रम असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले असून इंद्रजीत भाऊ पवार यांच्या या अभिनव सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



