सोलापूर

सोलापूर प्रशासनात IAS-IPS दांपत्याची चर्चा; जिल्हा परिषदेत कुशल जैन तर पोलीस दलात वृष्टी जैन

नागपूरच्या उमरेड उपविभागातून वृष्टी जैन यांची सोलापूर पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती

सोलापूर प्रशासनात IAS-IPS दांपत्याची चर्चा; जिल्हा परिषदेत कुशल जैन तर पोलीस दलात वृष्टी जैन

नागपूरच्या उमरेड उपविभागातून वृष्टी जैन यांची सोलापूर पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती

सोलापूर :- सोलापूरच्या प्रशासकीय वर्तुळात सध्या एका नव्या IAS-IPS दांपत्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या पत्नी तथा भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी वृष्टी जैन यांची सोलापूरच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पोलीस प्रशासन या दोन्ही महत्त्वाच्या यंत्रणांमध्ये हे अधिकारी दांपत्य कार्यरत राहणार आहे.

वृष्टी जैन यांनी 19 डिसेंबर 2022 रोजी भारतीय पोलीस सेवेत अधिकृतपणे प्रवेश केला. प्रशिक्षण कालावधीसह त्यांनी पोलीस सेवेत आतापर्यंत सुमारे चार वर्षांचा अनुभव मिळवला आहे. आपल्या सेवाकाळात त्यांनी शिस्तबद्ध प्रशासन, संवेदनशील पोलिसिंग आणि प्रभावी समन्वय यामुळे विशेष ओळख निर्माण केली आहे.

यापूर्वी त्या नागपूर जिल्ह्यातील उमरेड उपविभागात कार्यरत होत्या. 9 सप्टेंबर 2024 पासून त्यांनी त्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. ग्रामीण आणि निमशहरी भागातील कायदा-सुव्यवस्था, गुन्हे नियंत्रण आणि जनसंपर्क यामध्ये त्यांनी प्रभावी कामगिरी केल्याची चर्चा प्रशासनात होती.

दुसरीकडे, कुशल जैन हे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असून, विविध विकासकामे, ग्रामीण प्रशासन आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत सक्रिय भूमिका बजावत आहेत.

आता या IAS-IPS दांपत्याच्या माध्यमातून सोलापुरात प्रशासन आणि पोलीस यंत्रणेमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सोलापूरच्या प्रशासकीय वर्तुळात या नियुक्तीची विशेष चर्चा सुरू असून, नागरिकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!