सोलापूर

“मोहोळ यात्रेत गोडसे बंधूंचा सेवाभाव; यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्याचे वाटप”

कै. दत्तात्रय गोडसे यांच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे पाणी वाटप; यात्रेकरूंना दिलासा

“मोहोळ यात्रेत गोडसे बंधूंचा सेवाभाव; यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्याचे वाटप”

कै. दत्तात्रय गोडसे यांच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे पाणी वाटप; यात्रेकरूंना दिलासा

मोहोळ (प्रतिनिधी):-  मोहोळ येथे पार पडलेल्या श्री नागनाथ महाराज यात्रेत गोडसे बंधूंनी सामाजिक बांधिलकी जपत यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून सेवाभावाचा आदर्श निर्माण केला. कै. दत्तात्रय चांगदेव गोडसे यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात राबविण्यात आला.

जिल्हा परिषद सोलापूर येथील प्रशासन अधिकारी अविनाश दत्तात्रय गोडसे व काशीमीरा पोलीस स्टेशन, मुंबई येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश दत्तात्रय गोडसे यांच्या पुढाकारातून यात्रेकरूंना थंड पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. यात्रेतील मोठ्या गर्दीत यात्रेकरूंना दिलासा देणारा हा उपक्रम ठरला.

या पाणी वाटप उपक्रमाचा शुभारंभ मोहोळ पंचायत समिती गटनेते संजीव (दादा) खिलारे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब गायकवाड, राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशालेचे प्राचार्य सुधीर गायकवाड, मुख्याध्यापक संतोष गायकवाड तसेच नगरसेवक सुशील (भय्या) क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी सुनिल गायकवाड, कारभारी गायकवाड, जगदीश गोडसे, आसावरी गोडसे, आदेश गोडसे, विभावरी गोडसे, माहेश्वरी गोडसे, जान्हवी गोडसे, श्लोक गोडसे, वैष्णवी चव्हाण, शिवदत्त चव्हाण, सुरेश राऊत, आयुब इनामदार, चंद्रकांत सुळ, सुरेश माळी, अफिज सादिक इनामदार, शकील इनामदार, रुतुराज गायकवाड, बाहुबली खांडेकर, दिगंबर व्हनमाने आदी मान्यवर उपस्थित होते.

या सेवाभावी उपक्रमाबद्दल यात्रेकरूंनी गोडसे बंधूंचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही यात्रेकरूंना मोठा दिलासा देणारी ठरली.

मोहोळ येथील नागनाथ महाराज यात्रेत गोडसे बंधूंनी केलेले पाणी वाटप हे केवळ सेवा नसून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरले आहे. अशा उपक्रमांमुळे यात्रेचा उत्साह वाढून समाजात सेवाभावाची प्रेरणा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!