सोलापूर

लाड कमिटीअंतर्गत १४ जणांना नियुक्ती आदेश; महापौर कोंड्याल यांच्या हस्ते वितरण

लाड कमिटीअंतर्गत १४ जणांना नियुक्ती आदेश; महापौर कोंड्याल यांच्या हस्ते वितरण

सोलापूर :- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज महापौर कार्यालयात लाड कमिटीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यात एकूण १४ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. महापौर श्री. विनायक कोंड्याल यांच्या हस्ते संबंधित उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.

यावेळी महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यक्षम, पारदर्शक व नागरिकाभिमुख प्रशासन देण्याच्या उद्देशाने पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात येत आहे. लाड कमिटीमार्फत पूर्णपणे पारदर्शक प्रक्रियेतून ही भरती करण्यात आली असून, नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या सेवेस प्राधान्य देत आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.


या नियुक्त्यांमध्ये ११ बिगारी व ३ सफाई कामगारांना आदेश देण्यात आले. नियुक्त उमेदवारांनी यावेळी आनंद व्यक्त करत महानगरपालिकेच्या सेवेत प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या प्रसंगी सभागृह नेते श्री. नरेंद्र काळे, गटनेते अमोल बापू शिंदे, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, उपायुक्त श्री. आशिष लोकरे, नगरसेवक श्री. सिद्धेश्वर कमटम यांच्यासह अन्य मान्यवर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी नियुक्त उमेदवारांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कार्यासाठी यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमास संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!