देश - विदेश

काचेतून साकारला महामानव – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अद्वितीय पुतळा

काचेतून साकारला महामानव – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अद्वितीय पुतळा

मुंबई :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, बौद्धीसत्व, भारतरत्न आणि महान कायदेपंडित परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काचेपासून साकारलेला आकर्षक आणि देखणा पुतळा सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. पारदर्शक काचेतून तयार करण्यात आलेल्या या पुतळ्यात बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची विचारसंपदा आणि संघर्षमय जीवनाचा तेजस्वी संदेश जिवंतपणे दिसून येतो.

या अनोख्या पुतळ्यात बाबासाहेब नेहमीप्रमाणे हातात पुस्तक आणि काठी धरलेल्या मुद्रेत उभे असल्याचे दर्शन घडते. काचेच्या पारदर्शक माध्यमातून तयार केलेल्या या शिल्पकृतीमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक तेजस्वी व प्रेरणादायी भासते. कला आणि सामाजिक विचारांचा सुंदर संगम या पुतळ्यात पाहायला मिळतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यांचा संदेश दिला. त्यांच्या कार्यामुळे देशातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांना नवी दिशा मिळाली. काचेतील हा पुतळा केवळ एक शिल्प नसून, त्यांच्या महान विचारांची आणि सामाजिक क्रांतीची जिवंत आठवण असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

या अनोख्या शिल्पकृतीमुळे युवकांमध्ये प्रेरणा जागृत होत असून, बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण कायम राहावे, हा या कलाकृतीमागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. समाजात समानता आणि न्यायाचा संदेश देणारा हा काचेचा पुतळा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!