सोलापूर

माढा होणार सांस्कृतिक-शेती पर्वाचा केंद्रबिंदू; विधायक अभिजीत पाटील यांची भव्य संकल्पना

माढा (प्रतिनिधी):- माढा तालुक्यात येत्या २० ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान एक भव्य आणि बहुआयामी कृषी व सांस्कृतिक महोत्सव रंगणार आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि माढ्याचे आमदार अभिजीत (आबा) पाटील यांच्या प्रेरणेतून हा आगळावेगळा महोत्सव माढा शहरातील सहकार महर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद हायस्कूल, वैराग रोड येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे.

महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आमदार अभिजीत पाटील यांनी प्रत्यक्ष स्थळभेट देत स्टेज पूजन केले. त्यावेळी माढ्यातील विविध राजकीय मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

माढा तालुक्याच्या शेती विकासाला नवी दिशा देण्यासाठी या महोत्सवात आधुनिक शेतीवरील विविध उपक्रमांची आकर्षक खुलेआम प्रदर्शने होणार आहेत. यामध्ये—अत्याधुनिक शेती यंत्रसामुग्री,बी-बियाणे, खते आणि कृषी पूरक उद्योग,दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन,तंत्रज्ञान,जलसंधारण आणि स्मार्ट सिंचन प्रणाली,कृषी प्रक्रिया उद्योग मॉडेल्स,यासोबत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन सत्रे, विशेष कार्यशाळा, शेती तज्ञांची व्याख्याने, तसेच शासकीय योजनांची माहिती आणि ऑन-द-स्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

माढा शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्यासाठी महोत्सवात नामवंत-अभिनेते,अभिनेत्री,हास्यकलाकार,लोककला पथके,नृत्य व संगीतकार,बालकलाकार,यांच्या कार्यक्रमांनी रंगणार आहे. स्थानिक कलावंतांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर विशेष भर असेल. ग्रामीण संस्कृती, लोककला, संगीत, नाट्य, महिला उद्योजकांचे स्टॉल्स, मुलांसाठी मनोरंजनासह अनेक उपक्रमांची रेलचेल असेल.

शेती, उद्योग, हस्तकला, स्टार्टअप प्रकल्प आणि महिला बचतगटांना प्रोत्साहन मिळावे, युवा वर्गाला रोजगाराभिमुख संधी मिळाव्यात या हेतूने विठ्ठल प्रतिष्ठानतर्फे हा महोत्सव अत्यंत नियोजनबद्ध रितीने आयोजित केला जात आहे.

माढा तालुका, पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव, महिला बचतगट, युवक-युवती, उद्योजक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचे सौंदर्य वाढवावे, असे आवाहन आमदार अभिजीत (आबा) पाटील आणि विठ्ठल प्रतिष्ठान यांनी केले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!