महाराष्ट्र

श्रीमती निर्मलाताई कनिष्ठ महाविद्यालयाची कु. प्रगती शिंदे राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेसाठी पात्र

श्रीमती निर्मलाताई कनिष्ठ महाविद्यालयाची कु. प्रगती शिंदे राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेसाठी पात्र

सोलापूर (प्रतिनिधी) :- अमरावती येथे दि. १८ ते २० डिसेंबर या कालावधीत पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत आर्चरी – रिकव्हर या क्रीडा प्रकारात श्रीमती निर्मलाताई ठोकळ कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता ११ वी मधील विद्यार्थिनी कु. प्रगती शिंदे हिने उल्लेखनीय कामगिरी करत चार पदकांची कमाई केली आहे.

१७ वर्षे वयोगटात पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करत खेळताना कु. प्रगती शिंदे हिने १ सुवर्णपदक, १ रौप्यपदक व २ कांस्यपदके पटकावली. तिच्या या दैदीप्यमान यशामुळे तिची रांची (झारखंड) येथे दि. ६ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड झाली आहे.

सध्या कु. प्रगती शिंदे ही तज्ञ मार्गदर्शक श्री. रंजित चामले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे कठोर सराव करत आहे. तसेच महाविद्यालयातील क्रीडा मार्गदर्शक श्री. सुरवसे ए. पी. यांचेही तिला सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. विपिन ठोकळ, उपाध्यक्ष श्री. सचिन ठोकळ, सचिव श्री. भिकाजी गाजरे, संचालिका शिल्पाताई ठोकळ तसेच प्राचार्य श्री. डी. गाजरे यांनी कु. प्रगती शिंदेचे अभिनंदन करत तिच्या पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

या यशामुळे श्रीमती निर्मलाताई ठोकळ कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेत आणखी एक सुवर्णपान जोडले गेले असून परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!