महाराष्ट्र

इंधन बचतीसाठी गडकरींचा मोठा निर्णय; VIP ताफ्यातील गाड्या निम्म्यावर

पालखी मार्ग पाहणीसाठी बस प्रवास; गडकरींचा साधेपणाचा आदर्श

इंधन बचतीसाठी गडकरींचा मोठा निर्णय; VIP ताफ्यातील गाड्या निम्म्यावर

पालखी मार्ग पाहणीसाठी बस प्रवास; गडकरींचा साधेपणाचा आदर्श

पुणे (प्रतिनिधी) :- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी इंधन बचत, वाहतूक व्यवस्थापन आणि साधेपणाचा संदेश देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यावेळी VIP ताफ्यातील वाहनांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

१३ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रानुसार, गडकरी १४ आणि १५ मे रोजी पालखी मार्ग प्रकल्पाची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यात इंधनाचा वापर कमी व्हावा तसेच वाहतुकीवरील ताण कमी व्हावा यासाठी त्यांनी स्वतः बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

पत्रात नमूद केल्याप्रमाणे, पंतप्रधानांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने इंधन बचत करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर गडकरी अधिकाऱ्यांसह, पत्रकार आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन बसने प्रवास करणार आहेत. त्यामुळे वाहतूक नियंत्रण अधिक सुलभ होईल आणि सामान्य नागरिकांनाही कमी त्रास होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, गडकरी यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना देत नियमित ताफ्याच्या तुलनेत केवळ ५० टक्के वाहनेच वापरण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यानुसार आवश्यक नियोजन करावे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

पालखी मार्ग हा लाखो वारकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो. दरवर्षी आषाढी वारीसाठी राज्यभरातून वारकरी या मार्गाने पंढरपूरकडे प्रस्थान करतात. त्यामुळे या मार्गावरील रस्ते, सुविधा, सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, शासकीय ताफे आणि अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी हा आदर्श ठरू शकतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!