डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांचे प्रभावी मांडणारे साहित्यिक मनिष सुरवसे सन्मानित

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांचे प्रभावी मांडणारे साहित्यिक मनिष सुरवसे सन्मानित
सोलापूर (प्रतिनिधी) :- लायन्स क्लब सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणारा युवा साहित्यिक पुरस्कार सन्मित्र मनिष सुरवसे यांना जाहीर झाल्याचे वृत्त साहित्यक्षेत्रात आनंददायी ठरले आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मनिष सुरवसे हे आपली नोकरी सांभाळत सातत्याने मौलिक व विचारप्रवर्तक लेखन करत आहेत. त्यांच्या लेखनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर अत्यंत नेमक्या, मोजक्या आणि परिणामकारक शब्दांत केला जातो. सामाजिक वास्तव, समता, न्याय आणि मानवतावाद या मूल्यांची ठळक मांडणी त्यांच्या साहित्यात सातत्याने दिसून येते.
दि. १७ व १८ डिसेंबर २०२५ रोजी दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर येथे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित जिल्हा मराठी साहित्य संमेलनात “सोलापूर जिल्ह्यातील डॉ. आंबेडकरी लेखकांची परंपरा” या विषयावर झालेल्या परिसंवादात डॉ. सारीपुत्र तुपेरे यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करताना मनिष सुरवसे यांच्या लेखनाचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे अधोरेखित केले. त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेणारी ही मांडणी उपस्थित रसिकांच्या विशेष लक्षात राहिली.
मनिष सुरवसे यांच्या या सन्मानामुळे सोलापूरच्या साहित्यिक परंपरेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे. भविष्यात त्यांच्या हातून अधिकाधिक दर्जेदार, विचारशील व समाजप्रबोधन करणाऱ्या कलाकृती निर्माण होत राहोत, अशा शुभेच्छा साहित्यप्रेमींकडून व्यक्त होत आहेत.



