नेहरूनगरमध्ये ‘PURE ENERGY’ व ‘DRIVEX’ विद्युत दुचाकी शोरूमचे दिमाखदार उद्घाटन
नेहरूनगरमध्ये ‘PURE ENERGY’ व ‘DRIVEX’ विद्युत दुचाकी शोरूमचे दिमाखदार उद्घाटन
सोलापूर (प्रतिनिधी) :- दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी सोलापूर शहरातील नेहरूनगर येथील कुबेर चेंबर, जी-१७ येथे पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देणाऱ्या PURE ENERGY आणि DRIVEX या नामांकित कंपन्यांच्या विद्युत दुचाकी वाहनांच्या शोरूमचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.


या शोरूमचे उद्घाटन सौ. शांता चंद्रकांत पवार व श्री. अजय चंद्रकांत पवार (इंजिनिअर, U.S.A.) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी स्थानिक नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्युत वाहनांचे वाढते महत्त्व अधोरेखित करत, इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने विद्युत दुचाकी ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. नव्या शोरूममधून ग्राहकांना आधुनिक डिझाइन, उत्तम बॅटरी क्षमता, कमी खर्चात देखभाल तसेच विश्वासार्ह सेवा उपलब्ध होणार आहे.
या शोरूममध्ये Sales, Service व Spare Parts या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, शहरासह परिसरातील ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. विशेषतः युवक व दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही विद्युत दुचाकी वाहने किफायतशीर व पर्यावरणपूरक ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनी शोरूममधील विविध मॉडेल्सची पाहणी केली व या उपक्रमासाठी आयोजकांचे कौतुक केले. नेहरूनगर परिसरात सुरू झालेल्या या नव्या विद्युत दुचाकी शोरूममुळे सोलापूर शहराच्या आधुनिक व शाश्वत विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
संपर्क – 8655844217




