नगरपरिषद निवडणुकीसाठी कामगारांना भरपगारी सुट्टी; मतदान नाकारल्यास कारवाईचा इशारा
सोलापूर (प्रतिनिधी) दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 संदर्भात जिल्ह्यातील कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून भरपगारी सुट्टी देण्याचा आदेश शासनाने जारी केला आहे.मतदान क्षेत्राबाहेर नोकरी करत असले तरी फक्त त्या क्षेत्रातील नोंदणीकृत मतदारांना ही सुविधा लागू होणार आहे.
या सुट्टीचा आदेश खालील सर्व आस्थापनांना बंधनकारक आहे,
कारखाने
दुकाने
खाजगी कंपन्या
हॉटेल्स / रेस्टॉरंट्स
शॉपिंग मॉल्स आणि रिटेलर्स
माहिती तंत्रज्ञान कंपन्या
औद्योगिक उपक्रम
नाट्यगृहे आणि व्यावसायिक आस्थापना
धोकादायक यंत्रणा, आवश्यक सेवा, उत्पादन बंद झाल्यास मोठे नुकसान होणाऱ्या उद्योगांमध्ये पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास, किमान 2 ते 3 तासांची मतदान सवलत देणे अनिवार्य राहील.
आस्थापना मालकांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक असून उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.कामगारांना मतदानाकरिता सुट्टी किंवा वेळ न दिल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात तक्रार नोंदवता येणार आहे.
हेल्पलाईन क्रमांक : 0217-2728401

मतदानाचा हक्क नाकारला, दबाव टाकला किंवा सुट्टी नाकारली तर संबंधित आस्थापना,व्यवस्थापन,मालक यांच्याविरुद्ध कामगार कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनी नागरिकांना आवाहन केले की “लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे.
कोणत्याही कामगाराला मतदानापासून वंचित ठेवले जाणार नाही.”



