सोलापूर

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ‘उमेद’च्या महिलांना कौतुकाची थाप; गणेशोत्सवात १.६५ कोटींची विक्रमी उलाढाल

५ दिवसांत ५५ हजार ७६४ गणेशमूर्तींची विक्री; १६३ विक्री केंद्रांवर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ‘उमेद’च्या महिलांना कौतुकाची थाप; गणेशोत्सवात १.६५ कोटींची विक्रमी उलाढाल

५ दिवसांत ५५ हजार ७६४ गणेशमूर्तींची विक्री; १६३ विक्री केंद्रांवर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर : ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता समूहातील महिलांचे काम अत्यंत उल्लेखनीय असून, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हेच ‘उमेद’ अभियानाचे मुख्य ध्येय आहे. महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असे मत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष सोलापूर अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये नुकताच ‘गणेशोत्सव व गौरी गणपती महोत्सव २०२६’ अत्यंत उत्साहात पार पडला. या महोत्सवाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तब्बल १ कोटी ६५ लाख १८ हजार ७६३ रुपयांची बंपर उलाढाल करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
त्याबद्दल नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी उमेद अभियान मधील महिला बचत गटांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे इ.उपस्थित होते.

अवघ्या ५ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांनी ५५,७६४ गणेशमूर्तीं खरेदी करून महिला बचत गटांच्या मूर्तींना पसंती दिली. सदरचे स्टॉल हे सर्व पंचायत समित्या, बस स्थानके, सर्व गावात आणि मुख्य गर्दीच्या ठिकाणी एकूण १६३ विक्री केंद्रे आणि स्टॉल्स उभारण्यात आले होते.ठोक आणि किरकोळ विक्रीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

उमेद अभियान अंतर्गत महिलांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात उमेद मॉल उभारणी करण्यात येत आहे.

जयकुमार गोरे
मंत्री ग्रामविकास व पंचायत राज
महाराष्ट्र शासन

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!