सोलापूर

विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

सोलापूर : कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथील विश्वकर्मा फाउंडेशनच्या वतीने प्रवाशांच्या सोयीसाठी स्वखर्चातून सुसज्ज बस स्टँड उभारण्यात आला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांना उन्हाळा, पावसाळा व इतर प्रतिकूल हवामानात सुरक्षित निवारा उपलब्ध होणार आहे.

विश्वकर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक सुतार यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम साकारण्यात आला. समाजसेवा हेच ध्येय ठेवून गेल्या १५ वर्षांपासून फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व लोकहिताचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. त्याच सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून कारंबा येथील नागरिक व प्रवाशांच्या सोयीसाठी हा बस स्टँड उभारण्यात आला.

या उपक्रमासाठी महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजीराजे पवार तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत (भाऊ) पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या उपक्रमामुळे प्रवाशांना उन्हा-पावसापासून संरक्षण मिळणार असून बसची प्रतीक्षा अधिक सुरक्षित व आरामदायी वातावरणात करता येणार आहे. या लोकहिताच्या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करत विश्वकर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक सुतार यांचे अभिनंदन केले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!