लिपिक संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत अविनाश गोडसे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड
राज्यभरातील लिपिकांची उपस्थिती; लिपिक संघटनेला नवे नेतृत्व मिळाले
लिपिक संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत अविनाश गोडसे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड
राज्यभरातील लिपिकांची उपस्थिती; लिपिक संघटनेला नवे नेतृत्व मिळाले
सोलापूर (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेची राज्य कार्यकारिणी संवाद बैठक दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सोलापूर येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत लिपिकांच्या वेतन त्रुटी, पदोन्नती टप्पे कमी करणे आणि वर्ग-१ पर्यंत वेतन मिळवून देण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीस संघटनेचे राज्याध्यक्ष सागर बाबर व राज्य कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी यांनी उपस्थित राहून लिपिकांच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केले.

राज्याध्यक्ष सागर बाबर यांनी लिपिकांच्या वेतन त्रुटीचा मुद्दा उपस्थित करत सांगितले की,
लिपिकांनी तांत्रिक पदांशी तुलना न करता राज्य शासनाच्या लिपिकांशी तुलना करावी
पदोन्नतीचे चार टप्पे कमी करून दोन टप्प्यांत पदोन्नती रचना करावी
मंजूर पदसंख्या कमी न करता उलट कामाच्या वाढत्या व्याप्तीनुसार पदसंख्या वाढवावी
यावेळी उपस्थित लिपिकांच्या प्रश्नांवर थेट संवाद साधण्यात आला.

मा. आमदार सत्यजित देशमुख यांच्या प्रयत्नातून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे झालेल्या बैठकीची माहिती देण्यात आली.
राज्य कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी यांनी सांगितले की,
कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी ही दोन पदे एकत्र करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे
वरिष्ठ सहाय्यक व कनिष्ठ सहाय्यक लिपिक पदे एकत्र करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे
या बदलांमुळे वेतन त्रुटी दूर होऊन लिपिकांना उच्च वेतनश्रेणीचा लाभ मिळेल
बैठकीपूर्वी लिपिक नेते कै. विवेक लिंगराज, कुर्डूवाडीचे कै. सयाजी बागल, साप्रवि चे कै. विशाल उंबरे यांच्यासह ज्ञात-अज्ञात लिपिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

•अविनाश गोडसे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड•
बैठकीनंतर सोलापूर जिल्ह्यातील लिपिकांनी बहुमताने अविनाश गोडसे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली. नव्या कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली.
नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार राज्याध्यक्ष सागर बाबर यांनी करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या बैठकीस राज्यभरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये विभागीय अध्यक्ष अशोक कासराळीकर, कमल दर्डा, आनंद सावंत, बालाजी अटकळे, विजय थोरात, रवि कांबळे, शिवसांभ चेड्डु, ओंकार पांचाळ, ठोंबरे, अनिल जगताप, नागेश पाटील, नागेश धोत्रे, सूर्यकांत मोहिते, कुमारगौरव शिंदे, हनुमंत भोसले, दिनेश बनसोडे, विजय कुलकर्णी, सचिन मायनाळ, सचिन घोडके, संजय गौडगाव, इरांना भरडे, आनंद साठे, महेश शेंडगे, विष्णू पाटील, सुमित कांबळे, अमोल धाकपडे, दिलीप भोसले, संतोष सातपुते, एस. एस. कुंभार, एस. डी. गुरव, कोमारी, रमाकांत उकिरडे, डी. ए. लांगोटे, के. एन. खुर्द, एस. एस. मोरे, एस. एस. देशमाने, निंबाळकर, विजय रणदिवे, एस. एन. बडे, संभाजी जाधव, प्रमोद यादव, आर. सी. लोखंडे, एस. जी. शेळके, ए. व्ही. सावंत, एस. ए. कानडे, बी. एस. झालते, एम. एस. गिराम, एस. टी. लमकाने, सी. एस. भोसले, आय. ए. सय्यद, एस. आर. जाधव, महेश कुलकर्णी, ज्ञानेश्वर केंगार, विरकुमार देशमुख, पांडुरंग दराडे, अजय रंगदाळ, प्रवीण डोळे, राहुल मुंढे, रणजित कांबळे, स्वप्नील कोरे, अनिल खडतरे, एस. ए. देशमुख आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश काळे यांनी केले. सोलापूर जिल्हा कार्यकारिणीने या बैठकीचे उत्कृष्ट नियोजन केले.
या बैठकीतून लिपिकांच्या वेतन व पदोन्नती संदर्भातील प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्यात आली असून, शासन पातळीवर पाठपुरावा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
लिपिकांच्या हक्कांसाठी संघटनेची एकजूट आणि पुढील लढ्याची दिशा या बैठकीत स्पष्ट झाली.



