“सीईओ असले तरी माणुसकी जपली” – द्वारपालाचा नमस्कार स्वीकारणारे कुशल जैन चर्चेत

“सीईओ असले तरी माणुसकी जपली” – द्वारपालाचा नमस्कार स्वीकारणारे कुशल जैन चर्चेत
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कुशल जैन यांनी पदभार स्वीकारतानाच आपल्या साधेपणा आणि नम्रतेने सर्वांची मने जिंकली आहेत. पदभार स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेत येत असताना घडलेला एक छोटासा प्रसंग सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
*द्वारपालाचा नमस्कार – आणि सीईओंची नम्र प्रतिक्रिया*
जिल्हा परिषद कार्यालयात प्रवेश करताना एका द्वारपालाने कुशल जैन यांना आदराने नमस्कार केला. विशेष म्हणजे, अनेक अधिकारी अशा प्रसंगांकडे दुर्लक्ष करतात; मात्र कुशल जैन यांनी तो नमस्कार अत्यंत नम्रतेने स्वीकारत प्रतिसाद दिला.
या छोट्याशा कृतीने उपस्थित कर्मचाऱ्यांवर मोठा प्रभाव पडला. “सीईओ असूनही इतकी साधेपणा आणि माणुसकी दाखवणारे अधिकारी दुर्मिळ असतात,” अशा प्रतिक्रिया जिल्हा परिषदेत उमटत आहेत.
या घटनेनंतर जिल्हा परिषदेत कुशल जैन यांच्या वागणुकीचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा रंगली असून, “नवीन सीईओ एकदम प्रेमळ आणि साधे आहेत,” अशी भावना व्यक्त केली जात आहे.
*शैक्षणिक व व्यावसायिक पार्श्वभूमी*
UPSC Civil Services Examination २०२१ मध्ये उत्तीर्ण; ऑल इंडिया रँक ४०
बंगळुरू येथील RV College of Engineering मधून बी.ई. (Information Science)
आयएएस होण्यापूर्वी Microsoft India मध्ये तांत्रिक क्षेत्रात काम
मूळ गाव: जबलपूर, मध्य प्रदेश
माजी सीईओ कुलदीप जंगम यांची पिंपरी चिंचवड येथे बदली झाल्यानंतर कुशल जैन यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पाणीटंचाई, शिक्षण आणि आरोग्य या मुद्द्यांवर प्राधान्याने काम करण्याचे संकेत दिले आहेत.
एकीकडे तरुण, तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकारी म्हणून ओळख; तर दुसरीकडे द्वारपालाचा नमस्कार नम्रतेने स्वीकारणारी साधी वागणूक—या दोन्ही गोष्टींमुळे कुशल जैन हे सोलापूर जिल्हा परिषदेत वेगळी छाप पाडताना दिसत आहेत.
प्रशासनात मोठं पद असलं तरी माणुसकी जपणं महत्त्वाचं असतं, याचा आदर्शच या घटनेतून दिसून आला आहे.


