महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सोलापूर मनपाकडून चित्रकला स्पर्धेचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सोलापूर मनपाकडून चित्रकला स्पर्धेचे आयोजन

सोलापूर (प्रतिनिधी):-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने शहरातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी सूचना जारी करण्यात आली आहे.मनपाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून, स्पर्धा दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत किल्ला बाग परिसरात आयोजित करण्यात येणार आहे.

या उपक्रमाचे आयोजन सोलापूर महानगरपालिका व आंतरराष्ट्रीय चित्रकार डॉ. संदीप खरात यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे.स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात येणार आहे. गट क्रमांक 1 मध्ये इयत्ता 5 वी ते 7 वीचे विद्यार्थी सहभागी होणार असून, गट क्रमांक 2 मध्ये इयत्ता 8 वी ते 10 वीचे विद्यार्थी सहभागी होतील. गट 1 साठी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिचित्र” हा विषय देण्यात आला आहे, तर गट 2 साठी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील कोणताही प्रसंग” हा विषय ठेवण्यात आला आहे.स्पर्धेसाठी लागणारे रंग, पेन्सिल व इतर साहित्य विद्यार्थ्यांनी स्वतःसोबत आणणे आवश्यक असून, कागद मात्र आयोजकांकडून देण्यात येणार आहे. स्पर्धेचा कालावधी 2 तासांचा असेल.

या स्पर्धेचा निकाल दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत सोलापूर महानगरपालिका आवारात जाहीर करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 9049102010 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाधिकारी मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ, सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहनही मनपाकडून करण्यात आले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!