राजकारण

‘अपयशी शहराध्यक्ष’ म्हणत भाजपचा पलटवार, राजकारण तापले ..सोलापुरात बॅनर वॉर पेटला!

‘अपयशी शहराध्यक्ष’ म्हणत भाजपचा पलटवार, राजकारण तापले ..सोलापुरात बॅनर वॉर पेटला!

सोलापूर :- सोलापूर शहरात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, काँग्रेस आणि भाजप यांच्यातील वाद आता थेट बॅनर वॉरच्या स्वरूपात समोर आला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी काही दिवसांपूर्वी मान-खटाव येथील सभापती निवडीसंदर्भात बॅनर लावत पालकमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका केली होती.

या टीकेला उत्तर देताना भाजप कार्यकर्त्यांनीही आक्रमक भूमिका घेत, नरोटेंच्या विरोधात थेट प्रहार करणारा बॅनर लावला आहे. या बॅनरमध्ये नरोटे यांना ‘अपयशी शहराध्यक्ष’ असे संबोधत त्यांच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

बॅनरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, नरोटे यांनी शहराध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर काँग्रेसची घसरगुंडी लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकेकाळी 44 नगरसेवक असलेल्या काँग्रेस पक्षाची संख्या केवळ 2 वर आल्याचे नमूद करत, हा उतरता आलेख नरोटेंच्या नेतृत्वामुळेच असल्याचा टोला भाजपकडून लगावण्यात आला आहे.

तसेच, मुख्यमंत्री, केंद्रीय गृह मंत्री, विद्यमान खासदार आणि मध्य विधानसभा मतदारसंघात सलग 15 वर्ष आमदार राहिलेल्या काँग्रेसला अलीकडील निवडणुकीत डिपॉझिट जप्त होईपर्यंत पराभव पत्करावा लागला, यावरही बॅनरमध्ये जोरदार टीका करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, हा बॅनर नरोटे यांच्या स्वतःच्या प्रभागात लावण्यात आल्याने राजकीय वातावरण आणखी चिघळले आहे. त्यामुळे सोलापुरात ‘बॅनर वॉर’ सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!