महाराष्ट्र

अवैध सावकारीविरोधात मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडवर ; “दामदुप्पट व्याज आकारणाऱ्यांचे लायसन्स रद्द”; अधिवेशनात कडक इशारा

“गरीबांना त्रास दिल्यास थेट कारवाई”; तक्रार करण्याचे आवाहन

अवैध सावकारीविरोधात मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडवर ; “दामदुप्पट व्याज आकारणाऱ्यांचे लायसन्स रद्द”; अधिवेशनात कडक इशारा

“गरीबांना त्रास दिल्यास थेट कारवाई”; तक्रार करण्याचे आवाहन

मुंबई :- राज्यातील वाढत्या अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात ठाम भूमिका मांडत कडक कारवाईचा इशारा दिला. सावकारीचे दोन प्रकार – लायसन्सधारक सावकार आणि अवैध सावकार – यांचा उल्लेख करत नियमबाह्य वसुली करणाऱ्यांना कुठलीही मुभा दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पैसे देऊन घरी जाऊन त्रास देणे, धमकी देणे, मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न करणे किंवा अवाजवी व्याजदर आकारणे असे प्रकार करणाऱ्या अवैध सावकारांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील. गरीब व गरजू नागरिकांवर अत्याचार होत असल्यास त्यांनी पुढे येऊन तक्रार करावी, असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले.

लायसन्स असले तरी नियमापेक्षा जास्त, दामदुप्पट व्याज आकारले जात असल्यास त्या सावकारांवरही कारवाई केली जाईल. “नियमाबाहेर व्याजदर आकारल्याचे आढळल्यास संबंधित सावकाराचे लायसन्स रद्द करण्यात येईल,” असे फडणवीस यांनी अधिवेशनात स्पष्ट शब्दांत सांगितले.

जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून, अवैध सावकारीविरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका घेण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणतीही तक्रार निर्भयपणे नोंदवावी, प्रशासन त्यांच्या पाठीशी उभे राहील, असा विश्वासही त्यांनी दिला.

राज्य सरकारच्या या भूमिकेमुळे अवैध सावकारांमध्ये खळबळ उडाली असून, सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले? सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा.

 

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!