राजकारण

सोलापूर महानगरपालिका निवडणूक : भाजपाचा ऐतिहासिक विजय, १०२ पैकी ८७ जागांवर निर्विवाद वर्चस्व

सोलापूर महानगरपालिका निवडणूक : भाजपाचा ऐतिहासिक विजय, १०२ पैकी ८७ जागांवर निर्विवाद वर्चस्व

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचा संपूर्ण निकाल जाहीर झाला असून, शहराच्या राजकारणात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. एकूण १०२ जागांच्या महापालिकेत भारतीय जनता पक्षाने तब्बल ८७ जागांवर दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमतासह सत्ता आपल्या हाती घेतली आहे. या विजयामुळे सोलापुरातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली असून भाजपाचा दबदबा अधिकच वाढला आहे.

Oplus_16908288

महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेनेला ४ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त १ जागा मिळाली असून, एमआयएमने ८ जागांवर विजय मिळवला आहे. पारंपरिकपणे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रभाव असलेल्या सोलापूर शहरात भाजपाने प्रचंड मुसंडी मारत इतर सर्व पक्षांना मागे टाकले आहे.

या निवडणुकीत विकास, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि शहराच्या सर्वांगीण विकासाचे मुद्दे मतदारांनी प्राधान्याने स्वीकारल्याचे चित्र दिसून आले. भाजपाने केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा प्रभावी प्रचार करत शहरातील विविध भागांमध्ये मतदारांचा विश्वास संपादन केला.

Oplus_16908288

दरम्यान, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससारख्या जुन्या पक्षांची घसरण ही आत्मपरीक्षणाची गरज दर्शवणारी ठरली आहे. एमआयएमने काही प्रभागांमध्ये आपले अस्तित्व टिकवले असले, तरी संपूर्ण महापालिकेवर भाजपाचाच वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण असून, शहरात ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सोलापूर महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता स्थापन होणार असून, पुढील पाच वर्षांत शहराच्या विकासासाठी मोठे निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

*सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०२६*

एकूण जागा : १०२
भाजप : ८७
काँग्रेस : ०२
शिवसेना : ०४
राष्ट्रवादी काँग्रेस : ०१
एमआयएम : ०८

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!