महाराष्ट्र

भारतीय संविधानाला अभिवादन; बार्टीकडून ऑनलाइन संविधान प्रश्नमंजुषा सुरू

भारतीय संविधानाला अभिवादन; बार्टीकडून ऑनलाइन संविधान प्रश्नमंजुषा सुरू

पुणे (प्रतिनिधी):- भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने घर घर संविधान अभियान अंतर्गत भारतीय संविधान प्रश्नमंजुषा ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. ही प्रश्नमंजुषा बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व नागरिकांसाठी खुली करण्यात आली असून सहभाग पूर्णपणे निशुल्क आहे.

या ऑनलाइन प्रश्नमंजुषेमध्ये भारतीय संविधानाशी संबंधित एकूण २५ प्रश्नांचा संच देण्यात आला आहे. यापैकी किमान १३ प्रश्नांची उत्तरे बरोबर दिल्यास सहभागी व्यक्तीस तात्काळ प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे. हे प्रमाणपत्र मा. महासंचालक व मा. निबंधक, बार्टी, पुणे यांच्या स्वाक्षरीचे असणार आहे.

संविधानातील मूल्ये, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये, लोकशाहीची तत्त्वे याविषयी जनजागृती व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थी, युवक, महिला, कर्मचारी, तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने या प्रश्नमंजुषेत सहभागी व्हावे, असे आवाहन बार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

संविधान प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी खालील संकेतस्थळावर भेट द्यावी :
https://constitution.barti.in/

ही प्रश्नमंजुषा सर्वांसाठी खुली असून “Everyone must participate in the quiz – Tribute to the Greatest Indian Constitution” या संदेशासह नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!