सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात निवडणूक काळात दारूची दुकाने तीन

सोलापूर (प्रतिनिधी) :- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात दारू विक्रीवर तात्पुरती बंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (भाप्रसे) यांनी दिलेल्या आदेशानुसार १, २ आणि ३ डिसेंबर २०२५ रोजी जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद राहतील.

सोलापूर जिल्ह्यातील खालील नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत-
अक्कलकोट
अकलुज
बार्शी
दुधनी
मैंदर्गी
करमाळा
कुर्डुवाडी
मंगळवेढा
मोहोळ
पंढरपूर
सांगोला
१ अनगर नगरपंचायत

दारूबंदी कालावधी
तारीख कारण स्थिती

१ डिसेंबर २०२५ मतदानाचा आदला दिवस मद्यविक्री पूर्णतः बंद
२ डिसेंबर २०२५ मतदानाचा दिवस मद्यविक्री पूर्णतः बंद
३ डिसेंबर २०२५ मतमोजणीचा दिवस मद्यविक्री पूर्णतः बंद

खालील प्रकारच्या परवान्यांवर बंदी लागू:

FL-2 (विदेशी दारू किरकोळ विक्री)

FL-3, FL-4 (क्लब अनुज्ञप्ती)

FL/BR-2

CL-2, CL-3

CL/FL/TOD-3

TD-1
आणि इतर सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या.

आदेश मोडणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांवर खालील कारवाई होईल-

तातडीची कायदेशीर कारवाई,

अनुज्ञप्ती रद्द,

महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ५४ आणि ५६ अंतर्गत कारवाई

ज्या क्षेत्रातील निवडणूक बिनविरोध संपली असेल, त्या क्षेत्रात हा आदेश लागू होणार नाही.

या आदेशाचा हेतू-
मतदान शांततेत पार पडावे,कायदा व सुव्यवस्था राखावी,मतदारांना निर्भय वातावरण मिळावे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व नागरिकांना, मद्यविक्री व्यावसायिकांना आणि संबंधित प्रशासनाला हा आदेश काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!