आमदार विजयकुमार देशमुख यांना मातृशोक; मातोश्री लीलावती देशमुख यांचे निधन
आमदार विजयकुमार देशमुख यांना मातृशोक; मातोश्री लीलावती देशमुख यांचे निधन
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर शहर उत्तरचे आमदार श्री. विजयकुमार देशमुख यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री लीलावती सिद्रामप्पा देशमुख (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने देशमुख कुटुंबावर तसेच सोलापूर शहर व परिसरात शोककळा पसरली आहे.
आज सायंकाळी ४ वाजता काळजापूर मारुती नजीक असलेल्या आमदार देशमुख यांच्या निवासस्थानाजवळून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यानंतर देगाव (ता. सोलापूर) येथे देशमुख मळा या शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
स्व. लीलावती देशमुख या धार्मिक वृत्तीच्या, शांत व संस्कारक्षम व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होत्या. त्यांच्या पश्चात मुले, मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने देगाव, काळजापूर व सोलापूर शहरातील नागरिकांनी तीव्र हळहळ व्यक्त केली आहे.
अनेक सामाजिक, राजकीय व सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवरांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन संवेदना व्यक्त केल्या असून, स्व. लीलावती देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.



