सोलापूर

श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

सोलापूर : श्री बृहन्मठ होटगी मठाचे तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या आठव्या पुण्याराधनानिमित्त काशी जगगुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात व बृहन्मठाध्यक्ष चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही विविध धार्मिक, शैक्षणिक व समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

अक्कलकोट रोड येथील मठात सोमवार दि. १५ डिसेंबर ते शुक्रवार दि. १९ डिसेंबर पर्यंत दररोज सायं. ६.०० ते ७.०० या वेळेत वीरशैव धर्मग्रंथ श्री सिद्धांत शिखाम णी ग्रंथ पारायण, बुधवार दि. १७ डिसेंबर रोजी शालेय स्तरावर भगवद्गीता श्लोक पाठांतर स्पर्धा, गुरुवार दि.१८ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वा. संस्थांतर्गत आंतरशालेय कबड्डी व हॉलीबॉल स्पर्धा, शनिवार दि. २० डिसेंबर रोजी सकाळी ११.०० ते सायं. ८.०० पर्यंत भक्तांना महाप्रसाद, सायं. ७.३० ते ८.३० पारितोषिक वितरण समारंभ, रात्री ८.३० ते ९.३० शिवाचार्य धर्मसंदेश व जगद्गुरूंचे आशीर्वाचन, रात्री १०.१० वा. श्रीशैल पीठाचे जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी व काशी पीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते व चिटगुप्पा, मागणगेरी, माळकवठा, नागणसूर, वडांगळी, शिखर शिंगणापूर, डोणज (सिद्धनेकेरी), लक्ष्मीपूर, गौडगाव, मैंदर्गी शहापूर सुलतानपूर, करीबंटनाळ व अक्कलकोट येथील महास्वामीजींच्या उपस्थितीत आत्मज्योत प्रज्वलन, गुरु नमन व श्रद्धांजली समर्पण, १०.३० ते पहाटे ५.०० पर्यंत भजन संपन्न होणार आहे. तर बाळीवेस (उत्तर कसबा) येथील मठात सोमवार दि१५ डिसेंबर ते शुक्रवार दि.१९ डिसेंबर पर्यंत दररोज सायं. ४.०० वा. श्री शिवयोगी सार्वभौम सिद्धेश्वर महाराज यांचे ग्रंथ पारायण, शनिवार दि. २० डिसेंबर रोजी पहाटे ५.०० वा “श्री”स संगीत रुद्राभिषेक, महापूजा होणार असून बुधवार दि. १७डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वा. एस. व्ही. सी.एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, भवानी पेठ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

शनिवार दि.२० डिसेंबर रोजी सकाळी ८.०० वा. तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींची बोरामणी (ता.द. सोलापूर) येथून पायी पालखी सोहळा दर्गनहळी, कुंभारी मार्गे श्री वीरतपस्वी मंदिर, एमआयडीसी येथे पोहोचल्यानंतर पालखीचे स्वागत, महामंगलारती व महाप्रसाद वाटप होणार आहे. मौजे होटगी ता.द. सोलापूर येथील बृहन्म ठात बुधवार दि१० डिसेंबर ते शनिवार दि. २० डिसेंबर दररोज साय.७.०० वा. प्रवचनकार पंडितरत्न वेदमूर्ती सिद्रामय्या शास्त्रीजी (विश्वाराध्य मठ बेडगीहाळ) यांचे ‘तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींचे पुराण’ या विषयावर प्रवचन, शनिवार दि. १४ डिसेंबर रोजी दु. ३.०० वा. श्री गुरु चन्नबसव प्रतिष्ठान (दुलंगे परिवार सोलापूर) यांच्या वतीने आरोग्य शिबिर, मोफत औषध वाटप, सोमवार दि. १५ डिसेंबर ते शुक्रवार दि. १९ डिसेंबर पर्यंत दररोज सायं. ४.०० वा. वीरशैव धर्मग्रंथ श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथ पारायण, शनिवार दि २० डिसेंबर रोजी रात्री १०.०० वा. बृहन्मठाध्यक्ष श्री चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते आत्मज्योत प्रज्वलन, रविवार दि २१ डिसेंबर रोजी सकाळी ६.०० वा. ‘श्रीस’ अभिषेक, विलवारचन, महापूजा, ८.०० वा. होटगी गावातून तपोरत्न आत्मज्योतीचे सवाद्य मिरवणूक, दुपारी १.०० वा. काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वाम ीजी यांच्या दिव्य सानिध्यात धर्मसभा, महामंगलारती व महाप्रसाद होईल.

सोमवार दि. २२ डिसेंबर रोजी सायं. ६.०० वा. पाळणा कार्यक्रम, रात्री ९.०० वा.श्री होटगीश्वर भक्त मंडळाकडून शोभेच्या आतषबाजीने म हास्वामींजीच्या पुण्याराधना कार्यक्रमाचा सांगता होईल. भक्तांच्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाची ज्योत पेटवणाऱ्या महान महास्वामींजीच्या या कार्यक्रमात सदभक्तानी तन, मन व धनाने सेवा समर्पित करून गुरुकृपेस पात्र व्हावे असे आवाहन श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या वतीने करण्यात आलेला आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!