सोलापूर

ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान; दक्षिण सोलापूर पंचायत समितीत सेवा संकल्प अभियानांतर्गत उपक्रम

गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या हस्ते ज्येष्ठांचा सत्कार; आरोग्यदायी व आनंदी जीवनासाठी शुभेच्छा

ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान; दक्षिण सोलापूर पंचायत समितीत सेवा संकल्प अभियानांतर्गत उपक्रम

गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या हस्ते ज्येष्ठांचा सत्कार; आरोग्यदायी व आनंदी जीवनासाठी शुभेच्छा

सोलापूर : पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवानिवृत्त व ज्येष्ठ नागरिकांचा गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

दरवर्षी १ ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठ नागरिकांनी समाजाच्या जडणघडणीत दिलेले योगदान, अनुभव आणि मार्गदर्शन यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती कार्यालयात हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी अब्दुल मज्जीद महमंद शेख, शेकाप्पा सिद्राम गाजूल, राजेश देशपांडे, अरुण क्षीरसागर, लतिका लोंढे, नुतन पिसे, राजेंद्र सोनकांबळे, अविनाश भोसले, अक्रम पठाण, पांडुरंग कविटकर, बापू करजखेडे, रमेश सोनके, नागनाथ धोत्रे, सुभाष फुलारी, शंकर जाधव, बादशहा मुल्ला, रमेश गायकवाड, यनमलप्पा चिट्टे आणि भीमाशंकर म्हेत्रे या ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाला आणि समाजातील योगदानाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले. ज्येष्ठांचे मार्गदर्शन पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असून, त्यांचे आरोग्य, आनंद आणि सन्मानपूर्ण जीवन यासाठी समाजाने संवेदनशीलतेने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यदायी, निरोगी आणि आनंदी जीवनासाठी ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मनिषा वास्ते, विस्तार अधिकारी ज्योतीराम भोसले, सदाशिव कोळी, शिवानंद सोलापूरे, सुरेश राठोड, कनिष्ठ लेखाधिकारी अंजू पाटील, तसेच संदीप घोडके, सुधीर फुलारी, मनोहर राठोड, रुपाली मोरे, जिलानी अन्सारी, रामकृष्ण पाटील, विनायक कुंचपोर, स्नेहा जाधव, शहानवाज शेख, शिवानंद नागूर, भीमाशंकर कोळी, पंडित व्हनमाने आणि अरुणा रांजणे यांच्यासह पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!