सोलापूर

जिल्हा परिषद कर्मचारी सह. पत संस्था नियमित नं. १ च्या चेअरमनपदी तजमुल मुतवल्ली, व्हाईस चेअरमनपदी चेतन वाघमारे

संचालक मंडळाच्या सभेत दोन्ही पदांवर बिनविरोध निवड; ज्येष्ठ मार्गदर्शकांकडून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन

जिल्हा परिषद कर्मचारी सह. पत संस्था नियमित नं. १ च्या चेअरमनपदी तजमुल मुतवल्ली, व्हाईस चेअरमनपदी चेतन वाघमारे

संचालक मंडळाच्या सभेत दोन्ही पदांवर बिनविरोध निवड; ज्येष्ठ मार्गदर्शकांकडून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन

सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पत संस्था नियमित नं. १, सोलापूरच्या चेअरमनपदी दक्षिण सोलापूर येथील श्री. तजमुल अब्दुल जलील मुतवल्ली यांची, तर व्हाईस चेअरमनपदी श्री. चेतन अनिल वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या ३० सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या विशेष सभेत संचालक मंडळाने एकमताने ही निवड केली.

सदर निवडणूक प्रक्रिया अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक उपनिबंधक, उत्तर सोलापूर श्री. डी. एस. भवर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत दोन्ही पदांवर एकमताने निवड झाल्याने संस्थेच्या कामकाजाला नव्या नेतृत्वाची दिशा मिळाली आहे.

निवडीनंतर अध्यासी अधिकारी श्री. डी. एस. भवर यांच्या हस्ते नवनिर्वाचित चेअरमन तजमुल मुतवल्ली व व्हाईस चेअरमन चेतन वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या माजी चेअरमन श्रीमती श्वेतांबरी राऊत व माजी व्हाईस चेअरमन श्री. श्रीधर कलशेट्टी यांनी आपल्या कार्यकाळात सर्व संचालकांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्यामुळे संस्थेचे कामकाज चांगल्या पद्धतीने व मनमोकळेपणाने करता आल्याचे सांगितले.

सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित चेअरमन तजमुल अब्दुल जलील मुतवल्ली यांनी, सर्व संचालक व सभासदांच्या सहकार्याने संस्थेचे कामकाज अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न राहील, असे सांगितले. संस्थेच्या हिताला प्राधान्य देत सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.

व्हाईस चेअरमन चेतन अनिल वाघमारे यांनीही सर्वांच्या सूचनांचा विचार करून आणि संचालक मंडळाच्या सहकार्याने संस्थेच्या प्रगतीसाठी काम करण्याचे आश्वासन दिले.

संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीशैल देशमुख यांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना संस्थेचे कामकाज नियमानुसार, पारदर्शकपणे व सर्वांना विश्वासात घेऊन करण्याच्या सूचना दिल्या. माजी चेअरमन श्रीमती श्वेतांबरी राऊत यांच्या कार्यपद्धतीचा संदर्भ देत संस्थेच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक व्ही. आर. गरड, प्रकाश शेटे, अशोक भोसले, व्ही. डी. नवले, पंडित भोसले, श्रीशैल देशमुख, दयानंद परिचारक आदींनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

सभेस सेवाज्येष्ठ संचालक डॉ. एस. पी. माने, संचालक एस. एन. कुंभार, एस. आर. तांबोळी, व्ही. एम. घेरडे, व्ही. व्ही. घोगरे, व्ही. बी. पाटील, जी. एम. मारडकर, एस. एच. राठोड, के. जी. लालबोंद्रे, एस. डी. म्हमाने, व्ही. के. शिंदे, आर. आर. घुले, सौ. एम. एस. शिंदे, तज्ज्ञ संचालक पी. व्ही. नवले, के. एन. खुर्द, स्वीकृत सदस्य तथा सचिव डी. एल. देशपांडे, कर्मचारी सुभाष काळे, विनोद कदम आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचा समारोप माजी व्हाईस चेअरमन श्री. श्रीधर कलशेट्टी यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!