सोलापूर

सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाची चौदा आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय NQAS प्रमाणपत्र

सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाची चौदा आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय NQAS प्रमाणपत्र

सोलापूर :- केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) आरोग्य संस्थांच्या दर्जा आणि सुविधांची पाहणी करून राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (National Quality Assurance Standards – NQAS) प्रदान करण्यात येते. राष्ट्रीय NQAS मूल्यांकन हे आरोग्य सेवेतील गुणवत्ता, रुग्णकेंद्रित सेवा, सुरक्षितता, स्वच्छता, व्यवस्थापन आणि प्रभावी सेवा वितरण यांचे राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च मानांकन मानले जाते.
आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय NQAS मूल्यांकनाच्या निकालात सोलापूर जिल्ह्यातील चार आयुष्मान आरोग्य मंदिरांनी (AAM) उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता मानांकन यशस्वीरित्या संपादन केले आहे. सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आज अखेर जिल्ह्यात एकुण चौदा आयुष्मान आरोग्य मंदिरांना हा बहुमान मिळविला आहे.

प्रमाणपत्र प्राप्त आयुष्मान आरोग्य मंदिरे (उपकेंद्रे):
१) आयुष्मान आरोग्य मंदिर, विजोरी ( 86.92%)
२) आयुष्मान आरोग्य मंदिर श्रीपत पिंपरी – (84.36%)
३) आयुष्मान आरोग्य मंदिर, लिंबिचिचोळी (80%)
४) आयुष्मान आरोग्य मंदिर- रातंजन (84.93%)

NQAS मानांकनाचे प्रमुख लाभ:
गुणवत्तापूर्ण व सुरक्षित आरोग्यसेवा: या मानांकनामुळे उपकेंद्र स्तरावर रुग्णकेंद्रित, सुरक्षित, संसर्गमुक्त आणि अत्यंत दर्जेदार आरोग्यसेवा अधिक बळकट होण्यास मदत होईल.
प्रशासकीय सुधारणा: आरोग्य केंद्रांमधील सेवा वितरण, रुग्ण सुरक्षा, औषध व आधुनिक उपकरण व्यवस्थापन, नोंदवही व्यवस्थापन तसेच रुग्णांच्या समाधानात सातत्याने वाढ होईल.
गुणवत्ता प्रोत्साहन निधी (Incentive Fund): मानांकन प्राप्त संस्थांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विशेष प्रोत्साहन निधी मिळण्यास पात्रता प्राप्त होते. या निधीचा वापर पायाभूत सुविधा, आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि रुग्णसुविधा अधिक मजबूत करण्यासाठी केला जाईल.
ग्रामीण भागाला मोठा फायदा: ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच विश्वासार्ह, मोफत आणि उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील.

हे यशामागे सोलापूर चे पालकमंत्री मा.जयकुमार गोरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.श्री दीपक वैद्य, मा.उपाध्यक्ष श्री इंद्रजीत पवार व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन व आरोग्य सभापती चेतनसिह केदार सावंत समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते, कृषी व संवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला बाल कल्याण समितीचे सभापती अमृता वाघे व पालकअधिकारी उपसांचलक डॉ भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व नियंत्रणात तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. मोहन शेगर आणि जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव व जिल्हा समन्वयक निखिल फताटे व यांची टीम च्या अथक प्रयत्न व कार्यामुळे सक्षम नेतृत्वामुळे शक्य झाले आहे.
हे यश जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच, भविष्यात जिल्ह्यातील अधिकाधिक आरोग्य संस्थांनी राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी अशा स्वयंशिकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे,तसेच भविष्यातील सर्व आरोग्य संस्था या राष्ट्रीय गुणवत्ता मानांकनासाठी प्राप्त होतील यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन सर्व माननीय महोदय यांनी केले आहे व तसेच अभिनंदन पण केले

• आज पर्यंत जिल्ह्यातील 14 आरोग्य संस्था qualified झाल्या असून आणखी सर्व आरोग्य संस्थेचे NQAS मानांकन प्राप्त करण्याचा मानस असून जनतेला दर्जेदार व सुरक्षित आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न राहील
– कुशल जैन. मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद सोलापूर. ‎

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!