सोलापूर

भीमा नदीत जाळ्यात अडकला तब्बल ४० किलोचा दुर्मिळ कटला; बरूर-टाकळीत महाकाय माशाची पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

नळी (ता. पंढरपूर) येथील पारंपरिक मच्छीमार गुलचंद भोई व अमोल भोई यांच्या जाळ्यात घवघवीत पकड; अनेक वर्षांनंतर मिळाला एवढ्या वजनाचा मासा

भीमा नदीत जाळ्यात अडकला तब्बल ४० किलोचा दुर्मिळ कटला; बरूर-टाकळीत महाकाय माशाची पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

नळी (ता. पंढरपूर) येथील पारंपरिक मच्छीमार गुलचंद भोई व अमोल भोई यांच्या जाळ्यात घवघवीत पकड; अनेक वर्षांनंतर मिळाला एवढ्या वजनाचा मासा

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर-टाकळी परिसरातून वाहणाऱ्या भीमा नदीत पारंपरिक पद्धतीने मासेमारी करत असताना तब्बल ४० किलो वजनाचा दुर्मिळ कटला मासा जाळ्यात अडकल्याने परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली. एवढ्या मोठ्या आकाराचा मासा पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली असून या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

 

नळी (ता. पंढरपूर) येथील गुलचंद भोई व अमोल भोई हे अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने भीमा नदीत मासेमारी करून उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे त्यांनी बरूर-टाकळी परिसरात नदीत जाळे टाकले. काही वेळाने जाळे ओढताना त्याला मोठा अडथळा जाणवू लागल्याने त्यांनी काळजीपूर्वक जाळे बाहेर काढले. त्यावेळी त्यामध्ये प्रचंड आकाराचा कटला मासा अडकल्याचे दिसून आले. वजन केल्यानंतर हा मासा तब्बल ४० किलोचा असल्याचे स्पष्ट झाले.

 

स्थानिक मच्छीमारांच्या मते, भीमा नदीत मोठ्या आकाराचे मासे अधूनमधून आढळतात; मात्र ४० किलो वजनाचा कटला मिळणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. त्यामुळे या महाकाय माशाची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच बरूर-टाकळी व आसपासच्या गावांतील नागरिकांनी तो पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. अनेकांनी माशासोबत छायाचित्रे काढत हा दुर्मिळ क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.

गुलचंद भोई आणि अमोल भोई यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून भीमा नदीत मासेमारी करत असून एवढ्या वजनाचा कटला प्रथमच जाळ्यात सापडला आहे. या पकडीमुळे त्यांच्यातही आनंदाचे वातावरण आहे. पकडलेला मासा स्थानिक बाजारात विक्रीसाठी नेण्यात आला असून त्याला चांगला दर मिळाल्याची माहिती मिळाली.

भीमा नदीकाठावरील अनेक कुटुंबांचा पारंपरिक मासेमारी हा प्रमुख उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे. नदीतील जैवविविधतेचे संवर्धन आणि नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर केल्यास भविष्यातही अशा दुर्मिळ व मोठ्या आकाराच्या माशांचे अस्तित्व कायम राहण्यास मदत होईल, असे मत स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!