सोलापूर

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी DYFI चे २४ तासांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला सोलापुरातून ऐक्य; प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलन अखंडित सुरू ठेवण्याचा इशारा

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी DYFI चे २४ तासांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला सोलापुरातून ऐक्य; प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलन अखंडित सुरू ठेवण्याचा इशारा

सोलापूर, दि. १७ जुलै : भाजपाचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी प्रसिद्ध शास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे गेल्या १९ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

 

या आंदोलनाला समर्थन व नैतिक पाठींबा व्यक्त करण्यासाठी भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (DYFI), सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने आज (१७ जुलै) सकाळी १० वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पुनम गेट, जिल्हा परिषद परिसर येथे २४ तासांचे एकदिवसीय अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आले. हे आंदोलन DYFIचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी व राज्य सचिव दत्ता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले आहे.

 

या प्रसंगी संघटनेचे जिल्हा सचिव ॲड. अनिल वासम यांनी सांगितले की, “सोनम वांगचुक यांच्या न्याय्य आंदोलनाची केंद्र सरकारने तात्काळ दखल घ्यावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. २४ तासांच्या आत प्रशासनाने या मागणीची दखल घेतली नाही, तर हे आंदोलन अखंडित स्वरूपात सुरू ठेवण्यात येईल.”

 

अन्नत्याग उपोषणात जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी, जिल्हा सचिव ॲड. अनिल वासम, राज्य सचिव दत्ता चव्हाण, जिल्हा सहसचिव विजय हरसुरे आणि ज्येष्ठ कार्यकर्ते सनी शेट्टी सहभागी झाले असून त्यांनी आज सकाळी १० वाजल्यापासून अन्नत्याग उपोषणास प्रारंभ केला आहे.

DYFI च्या वतीने केंद्र सरकारने आंदोलनाची गंभीर दखल घेऊन लोकशाही मार्गाने मांडण्यात आलेल्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी नरेश गुल्लापल्ली,अमित मंचले,योगेश आकिम, दिनेश बडगु, आप्पाशा चांगले, राहुल बुगले, सनी आमाटी, कुमार येलगेटी ,राधागोपाल बंडी,शशिकांत गुंडला,अजय भंडारी,अबू हुरेरा आदींची उपस्थिती होती.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!