इंद्रजीत पवार यांच्या प्रयत्नांना मोठे यश; उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध विकासकामांसाठी ४ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर
यमाई मंदिर-कारंजा, नान्नज-सांवरगाव, पाकणी-सावळेश्वरसह अनेक महत्त्वाच्या मार्गांच्या दुरुस्ती व सुधारणा कामांना हिरवा कंदील
इंद्रजीत पवार यांच्या प्रयत्नांना मोठे यश; उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध विकासकामांसाठी ४ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर
यमाई मंदिर-कारंजा, नान्नज-सांवरगाव, पाकणी-सावळेश्वरसह अनेक महत्त्वाच्या मार्गांच्या दुरुस्ती व सुधारणा कामांना हिरवा कंदील
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री मा. जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध विकासकामांसाठी तब्बल ४ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.

या निधीतून उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्ती व सुधारणा कामे हाती घेण्यात येणार असून त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या प्रश्नांना या निधीमुळे मार्ग मिळणार आहे.
मंजूर कामांमध्ये यमाई मंदिर ते कारंजा जोडरस्ता, नान्नज ते सांवरगाव रस्ता, गणपती मंदिर ते लक्ष्मी मंदिर मार्ग, माडी ते सेवालाल नगर, माडी ते नरोटेवाडी, पाकणी ते सावळेश्वर रस्ता आदी महत्त्वाच्या मार्गांच्या दुरुस्तीचा समावेश आहे. तसेच नात्रज-माडी-ऊळे रस्ता, रा.मा.म. २९९ ते एकेकवर रस्ता, पर्णकुटी ते नागनाथ मंदिर मार्ग आणि वाररकप वस्ती ते गणेशवाडी रस्ता यांसारख्या महत्त्वाच्या रस्त्यांच्या सुधारणा कामांनाही मंजुरी देण्यात आली आहे.
एकूण ११ विकासकामांसाठी ४ कोटी ७० लाख रुपये मंजूर झाले असून या कामांमुळे ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना या रस्त्यांचा मोठा लाभ होणार आहे.

याबाबत नागरिकांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचे आभार मानले असून विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. उत्तर सोलापूर तालुक्याच्या विकासासाठी आणखी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.




