सोलापूर

“पंतप्रधान मोदींच्या ‘नो व्हेईकल’ आवाहनाला सोलापूर जिल्हा परिषदेतून प्रतिसाद; सिईओ कुशल जैन आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार सायकलवरून कार्यालयात”

“पंतप्रधान मोदींच्या ‘नो व्हेईकल’ आवाहनाला सोलापूर जिल्हा परिषदेतून प्रतिसाद; सिईओ कुशल जैन आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार सायकलवरून कार्यालयात”

इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि जनजागृतीचा संदेश; प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदर्श उपक्रम चर्चेत

सोलापूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषणमुक्त भारतासाठी दिलेल्या “नो व्हेईकल” आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने आज अनोख्या पद्धतीने जनजागृती केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी आज सायकलवरून जिल्हा परिषद कार्यालयात हजेरी लावत नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला.

विशेष म्हणजे, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार हे प्रकृती अस्वस्थ असतानाही पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी सायकलवरून प्रवास करत जिल्हा परिषदेत पोहोचले. त्यांच्या या कृतीची जिल्हा परिषद परिसरात मोठी चर्चा रंगली असून अनेकांनी त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले.

दरम्यान, सिईओ कुशल जैन यांनीही इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी स्वतः सायकलची निवड केली. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी स्वतः पुढाकार घेत असल्याने कर्मचारी आणि नागरिकांमध्येही सकारात्मक संदेश गेला.

आजच्या या उपक्रमाद्वारे “एक दिवस वाहनाला विश्रांती” देत इंधन बचत, वाहतूक कोंडी कमी करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश देण्यात आला. जिल्हा परिषद परिसरात नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात पर्यावरण संवर्धन, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि इंधन बचतीसाठी नागरिकांनी शक्य तितका सार्वजनिक वाहतूक किंवा सायकलचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाचा हा उपक्रम लक्षवेधी ठरला आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!