क्राईम

नवी मुंबईत एसीबीची मोठी कारवाई सिडको करारासाठी लाच घेताना अप्पर जिल्हाधिकारीसह शिपायाला अटक

डिजिटल 7/12 चे जनक एसीबीच्या जाळ्यात

नवी मुंबईत एसीबीची मोठी कारवाई सिडको करारासाठी लाच घेताना अप्पर जिल्हाधिकारीसह शिपायाला अटक

डिजिटल 7/12 चे जनक एसीबीच्या जाळ्यात

नवी मुंबई (प्रतिनिधी) :- महसूल विभागात डिजिटल 7/12 प्रणाली राबविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि सध्या नवी मुंबई येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले रामदास हरीभाऊ जगताप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

१३ मे २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई पथकाने ही कारवाई केली. सिडकोच्या साडेबावीस टक्के योजनेतील जमिनीच्या करारासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेमध्ये मदत करण्याच्या बदल्यात २२ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारण्याची जबाबदारी जगताप यांनी शिपाई हरेश सोनवणे याच्याकडे सोपवली होती. त्यानुसार हरेश सोनवणे याने रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने सिडको कार्यालयात सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले.

रामदास जगताप हे महसूल विभागात डिजिटल 7/12 प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे राज्यभर परिचित झाले होते. प्रशासनातील तांत्रिक सुधारणा आणि ऑनलाइन महसूल सेवा यामध्ये त्यांनी काम केले होते. मात्र, आता त्यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

नवी मुंबईतील सिडको कार्यालयात झालेल्या या कारवाईनंतर एसीबीकडून आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि इतर संभाव्य गैरव्यवहारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे सरकारी यंत्रणांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

रामदास जगताप यांचे मूळ गाव जांबुत, तालुका शिरूर, जिल्हा पुणे असल्याची माहिती समोर आली आहे. एसीबीकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!