सोलापूर

जाहिरात क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व संदीप जव्हेरी यांचे निधन

जाहिरात क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व संदीप जव्हेरी यांचे निधन

सोलापूर (प्रतिनिधी):-  सोलापूरच्या जाहिरात क्षेत्रासाठी मोठा धक्का देणारी घटना घडली असून, संदीप जव्हेरी (वय ५४) यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या अकाली जाण्यामुळे शहरातील व्यावसायिक व जाहिरात क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

‘जव्हेरी ॲडव्हर्टायझिंग सर्व्हिसेस’ या संस्थेचे प्रमुख आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे जव्हेरी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर सोलापूरमधील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना गुरुवारी घरी आणले. अखेर शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

संदीप जव्हेरी यांनी जाहिरात क्षेत्रात दीर्घकाळ कार्य करत अनेक व्यावसायिकांना दिशा दिली होती. त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि प्रामाणिकपणामुळे त्यांनी सोलापूरमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने केवळ कुटुंबीयांनाच नव्हे, तर संपूर्ण जाहिरात क्षेत्राला मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, त्यांच्या राहत्या घरातून (जुना आरटीओ परिसर) शनिवारी सकाळी १० वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. त्यानंतर मोदी स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संदीप जव्हेरी यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतून शोक व्यक्त केला जात असून, त्यांच्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!