सोलापूर

सत्कारातून समाजसेवेचा नवा आदर्श; इंद्रजीत पवारांच्या उपक्रमातून ११ हजारांहून अधिक वह्यांचे विद्यार्थ्यांना वाटप

हार-शालऐवजी शिक्षण व कृषी विकासासाठी योगदान; उत्तर सोलापूरातील शेकडो विद्यार्थ्यांना लाभ

सत्कारातून समाजसेवेचा नवा आदर्श; इंद्रजीत पवारांच्या उपक्रमातून ११ हजारांहून अधिक वह्यांचे विद्यार्थ्यांना वाटप

हार-शालऐवजी शिक्षण व कृषी विकासासाठी योगदान; उत्तर सोलापूरातील शेकडो विद्यार्थ्यांना लाभ

सोलापूर : राजकारणातील पद आणि सन्मानाचा उपयोग समाजहितासाठी कसा करता येतो, याचा प्रेरणादायी आदर्श जिल्हा परिषद सोलापूरचे उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती मा. इंद्रजीत पवार यांनी घालून दिला आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सत्कारावेळी हार, पुष्पगुच्छ, शाल किंवा इतर भेटवस्तू स्वीकारण्याऐवजी शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि शेतकऱ्यांसाठी कृषी साहित्य देण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले होते. त्यांच्या या अभिनव संकल्पनेला मतदार, नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमातून तब्बल ११ हजारांहून अधिक वह्यांचे संकलन करण्यात आले. याशिवाय शेतीसाठी उपयुक्त विविध साहित्यही जमा करण्यात आले. संकलित शैक्षणिक साहित्याचे उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये वितरण करण्यात आले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आवश्यक साहित्य उपलब्ध झाले असून त्यांच्या शिक्षणाला मोठा आधार मिळाला आहे.

*या गावांतील विद्यार्थ्यांना मिळाला लाभ*

मार्डी, कारंबा, नान्नज, बाणेगाव, बी. बी. दारफळ, भोगाव, अकोलेकाटी, एकरूग, तरटगाव, हिप्परगा, हगलूर, खेड आणि गुळवंची या गावांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये वह्यांचे वितरण करण्यात आले.

या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अमोल बोराडे, अझर शेख, विनायक सुतार, अमोल सुतार, संजय आदाटे, संभाजी दडे, संतोष गोसावी, प्रताप गवळी, पिंटू जाधव, केदार तोडकरी, नागेश ननवरे, वैभव पाटील, पिंटू कापसे, यतीन देडे, दीपक डोंगे, हर्षल शिरसागर, बाबुराव भोरे, होळकर, श्रीकांत पाटील, विनोद पाटील, सचिन भिंगारे, दादा भिंगारे, श्याम शिंदे, सोमनाथ काळे, सुनिल जाधव आणि सुहास भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.

*शिक्षणासोबत कृषी क्षेत्रालाही बळ*

विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून शिक्षण क्षेत्राला आधार देतानाच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त कृषी साहित्याचे संकलन करून कृषी क्षेत्रालाही मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला. समाजाच्या विकासातील दोन महत्त्वाच्या घटकांना बळकटी देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण ठरला आहे.

यावेळी मा. इंद्रजीत पवार म्हणाले, “जनतेने दाखविलेला विश्वास आणि दिलेले प्रेम हीच माझी खरी ताकद आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत राहणे, हाच माझा संकल्प आहे.”

“आपला विश्वास… हाच माझा संकल्प!” या संदेशातून त्यांनी समाजसेवा आणि विकासकार्याप्रती आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!