सोलापूर

समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांच्या हस्ते अकलूजमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

चिमुकल्यांना दप्तर, पुस्तके व चॉकलेटचे वाटप; नव्या शैक्षणिक वर्षाचे जल्लोषात स्वागत

समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांच्या हस्ते अकलूजमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

चिमुकल्यांना दप्तर, पुस्तके व चॉकलेटचे वाटप; नव्या शैक्षणिक वर्षाचे जल्लोषात स्वागत

अकलूज : नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी अकलूज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ (मुले) व शाळा क्र. २ (मुली) येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते यांनी विशेष उपस्थिती लावत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षणाच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या चिमुकल्यांना नवीन दप्तर, पाठ्यपुस्तके आणि चॉकलेट देऊन त्यांचे आनंदाने स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि पालकांच्या डोळ्यांतील समाधान पाहण्यासारखे होते.

समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. ग्रामीण भागातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण तयार व्हावे यासाठी जिल्हा परिषद सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत शिक्षणात प्रगती करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमादरम्यान शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. नवागत विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय ठरावा यासाठी विशेष तयारी करण्यात आली होती.

यावेळी माळशिरसचे गट विकास अधिकारी श्री. पांढरे, गटशिक्षणाधिकारी महामुनी मॅडम, भाजपा अकलूज शहराध्यक्ष श्री. महादेव कावळे, नगरसेवक, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षकवृंद तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण शिक्षणाच्या बळकटीसाठी आणि विद्यार्थ्यांचा शाळेकडे ओढा वाढविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!