सोलापूर

‘नंबर वन’ सोलापूर जिल्हा परिषद घडवणारे कुलदीप जंगम यांची अचानक बदली; कुशल जैन जिल्हा परिषदेचे नवे CEO”

उत्कृष्ट कामगिरीनंतरही अचानक बदल; जिल्हा परिषदेत सायंकाळी चर्चांना उधाण

“‘नंबर वन’ सोलापूर जिल्हा परिषद घडवणारे कुलदीप जंगम यांची अचानक बदली; कुशल जैन जिल्हा परिषदेचे नवे CEO”

उत्कृष्ट कामगिरीनंतरही अचानक बदल; जिल्हा परिषदेत सायंकाळी चर्चांना उधाण

सोलापूर :- राज्यात आदर्श कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची अवघ्या १८ महिन्यांत अचानक बदली करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
त्यांची नियुक्ती आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अप्पर आयुक्त (Additional Commissioner) म्हणून करण्यात आली आहे.
दरम्यान, त्यांच्या जागी कुशल जैन यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कुलदीप जंगम यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा परिषद ‘सेवाकर्मी’ व ई-गव्हर्नन्स सुधारणा अभियानात राज्यात प्रथम क्रमांकावर झळकली. १५० दिवसांच्या मूल्यांकनात १०० पैकी ८० गुण मिळवत जिल्हा परिषद अव्वल ठरली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना “उत्कृष्ट कार्यालय प्रमुख” म्हणून सन्मानित करण्यात आले होते.

*कलेक्टरची चर्चा… पण वेगळीच बदली*

जिल्हा परिषदेत तसेच प्रशासकीय वर्तुळात अशी जोरदार चर्चा होती की, कुलदीप जंगम यांना त्यांच्या कामगिरीच्या जोरावर कलेक्टर पदावर बढती मिळू शकते.
मात्र प्रत्यक्षात त्यांची बदली अप्पर आयुक्त पदावर झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ही बाब सध्या जिल्हा परिषदेमध्ये चर्चेचा मुख्य विषय ठरली आहे.

बदलीची बातमी समोर आल्यानंतर सायंकाळी जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती. अचानक झालेल्या या निर्णयामुळे अनेकजण आश्चर्यचकित झाले.
“अव्वल कामगिरी करूनही बदली का?” असा प्रश्न कर्मचारी वर्तुळात चर्चिला जात असून, या बदलामागील कारणांबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

नवीन CEO म्हणून पदभार स्वीकारणारे कुशल जैन हे २०२२ बॅचचे IAS अधिकारी असून त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी (SDO) म्हणून काम पाहिले आहे.
तंत्रज्ञानाचा अनुभव असलेले आणि प्रशासनात नव्या दृष्टीकोनाने काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. नागरी सेवेत येण्यापूर्वी त्यांनी Microsoft India मध्येही काम केले आहे.

कुलदीप जंगम यांनी निर्माण केलेली पारदर्शकता, वेगवान निर्णयप्रक्रिया आणि विकासाचा वेग कायम ठेवणे हे आता कुशल जैन यांच्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण विकास, शिक्षण व आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी त्यांना ठोस आणि परिणामकारक निर्णय घ्यावे लागणार आहेत.

एकीकडे प्रभावी कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली, तर दुसरीकडे नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती—या दोन्ही घडामोडींमुळे सोलापूर जिल्हा परिषदेत नव्या प्रशासनिक पर्वाची सुरुवात झाली आहे.

कुलदीप जंगम यांनी घालून दिलेला आदर्श पुढे कुशल जैन कशा प्रकारे पुढे नेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!