विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान; निवडणूक कार्यक्रम जाहीर
उद्धव ठाकरेसह ९ सदस्य निवृत्त; नव्या सदस्यांसाठी निवडणूक रणधुमाळी सुरू
विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान; निवडणूक कार्यक्रम जाहीर
उद्धव ठाकरेसह ९ सदस्य निवृत्त; नव्या सदस्यांसाठी निवडणूक रणधुमाळी सुरू
मुंबई (प्रतिनिधी):- भारत निर्वाचन आयोग यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेतील आमदारांमार्फत निवडून येणाऱ्या ९ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी १२ मे २०२६ रोजी मतदान होणार असून, राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
*महाराष्ट्र विधानपरिषदेतील खालील सदस्यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपुष्टात येत आहे*
केणेकर संजय किशनराव
गोर्हे, नीलम दिवाकर
उद्धव ठाकरे
जोशी संदीप दिवाकर
केचे दादाराव यादव
मिटकरी अमोल रामकृष्ण
मोहिते-पाटील, रणजितसिंह विजय
राठोड,
राजेश धोंडीराम
शिंदे शशिकांत जयवंतराव
या सदस्यांच्या निवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या जागा भरण्यासाठी ही निवडणूक घेतली जात आहे. विशेष म्हणजे, यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, २३ एप्रिल २०२६ रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. उमेदवारांना ३० एप्रिलपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर २ मे रोजी अर्जांची छाननी, तर ४ मे ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल.
निवडणुकीसाठी १२ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया १३ मेपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.
या निवडणुकीत आमदारांच्या संख्याबळावर निकाल ठरणार असल्याने सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




