सोलापूर

आषाढी वारीतील उत्कृष्ट कामाबद्दल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार

उत्कृष्ट नियोजन प्रभावी समन्वय आणि वारकरी सेवेसाठी केलेल्या कार्याची दखल

आषाढी वारीतील उत्कृष्ट कामाबद्दल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार

उत्कृष्ट नियोजन प्रभावी समन्वय आणि वारकरी सेवेसाठी केलेल्या कार्याची दखल

पंढरपूर, दि. २५ : आषाढी एकादशी २०२६ निमित्त लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी करण्यात आलेल्या उत्कृष्ट नियोजन, प्रभावी समन्वय आणि अहोरात्र परिश्रमांची दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचा आज सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यंदाच्या आषाढी वारीत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्रशासनाने वारकऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्यापक नियोजन केले. या संपूर्ण व्यवस्थापनात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधत महत्त्वाची भूमिका बजावली.

 

वारीपूर्व तयारीपासून ते आषाढी एकादशीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर नगरपरिषद तसेच इतर संबंधित विभागांसोबत सातत्याने समन्वय बैठका घेण्यात आल्या. प्रत्येक बैठकीत वारीच्या नियोजनाचा आढावा घेऊन उद्भवणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण वारी व्यवस्थापन अधिक सुटसुटीत, सुरक्षित आणि परिणामकारक झाले.

 

स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, निवारा, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा तसेच इतर मूलभूत सुविधा लाखो वारकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचाव्यात यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने दिवस-रात्र परिश्रम घेतले. विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधून वारीचे नियोजन यशस्वीपणे राबविण्यात संदीप कोहिनकर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संदीप कोहिनकर यांचा सत्कार केला. आषाढी वारीसारख्या जागतिक कीर्तीच्या धार्मिक सोहळ्याचे यशस्वी व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

मुख्यमंत्री यांच्या हस्ते झालेला हा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाच्या समन्वयपूर्ण, सेवाभावी आणि वारकरी-केंद्रित कार्याचीही पोचपावती मानली जात आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!