मनोरंजन

हर्षवर्धन सदगीर ठरला ६८ वा महाराष्ट्र केसरी; सोलापूरच्या महेंद्र गायकवाड उपविजेते

वाघोलीत रंगलेल्या कुस्ती स्पर्धेत दमदार लढत; पारितोषिक रक्कम आता १ कोटींची

हर्षवर्धन सदगीर ठरला ६८ वा महाराष्ट्र केसरी; सोलापूरच्या महेंद्र गायकवाड उपविजेते

वाघोलीत रंगलेल्या कुस्ती स्पर्धेत दमदार लढत; पारितोषिक रक्कम आता १ कोटींची

पुणे (प्रतिनिधी) :- वाघोली येथे मोठ्या उत्साहात पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांनी शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत त्यांनी प्रतिस्पर्ध्यावर मात करत प्रतिष्ठेचा महाराष्ट्र केसरी किताब आपल्या नावे केला.

या थरारक अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यांनीही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपविजेतेपद मिळवले. दोन्ही कुस्तीपटूंनी दमदार झुंज देत प्रेक्षकांची मने जिंकली.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनीचित्रफीतीद्वारे विजेते व सर्व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन केले. स्पर्धेत मोठ्या प्रमाणात झालेल्या सहभागाचे कौतुक करत त्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पारितोषिक रकमेत मोठी वाढ जाहीर केली. यापूर्वी ४० लाख रुपये असलेली पारितोषिक रक्कम आता थेट १ कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच राज्यातील कुस्तीपटूंनी केवळ राज्यस्तरावर न थांबता आंतरराष्ट्रीय स्तरावरही पदके जिंकण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनीही महत्त्वपूर्ण घोषणा करत राज्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासून क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘क्रीडा स्पेशालिस्ट शाळा’ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कुस्ती क्षेत्रासाठी माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या योगदानाची आठवण करून दिली. भविष्यात कुस्तीपटूंना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या स्पर्धेमुळे राज्यातील कुस्ती परंपरेला नवसंजीवनी मिळाली असून, नवोदित कुस्तीपटूंना मोठे व्यासपीठ मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!