रमजान निमित्त जिल्हा परिषदेत इफ्तार सोहळा; मराठा सेवा संघाचा बंधुभावाचा संदेश
सर्व धर्मातील कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; सलोख्याचे दर्शन

रमजान निमित्त जिल्हा परिषदेत इफ्तार सोहळा; मराठा सेवा संघाचा बंधुभावाचा संदेश
सर्व धर्मातील कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; सलोख्याचे दर्शन
सोलापूर :- पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने मराठा सेवा संघाच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेत मुस्लिम कर्मचारी बांधवांसाठी रोजा इफ्तार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले असून बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा उपक्रम ठरला.
इफ्तारच्या निमित्ताने जिल्हा परिषद परिसरात आपुलकीचे वातावरण पाहायला मिळाले. सर्व धर्मातील अधिकारी आणि कर्मचारी एकत्र येऊन रमजान महिन्याच्या पवित्रतेचा अनुभव घेत असल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) स्मिता पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, तसेच संतोष कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, धर्म, जात आणि पंथ वेगवेगळे असले तरी आपण सर्वजण एकाच समाजाचे घटक आहोत. अशा कार्यक्रमांमुळे परस्पर स्नेह, बंधुभाव आणि सामाजिक एकात्मता अधिक दृढ होते. मराठा सेवा संघ दरवर्षी हा उपक्रम राबवत असून तो खरोखरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
या इफ्तार सोहळ्यात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे, सचिन साळुंखे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेश देशपांडे, दिनेश बनसोडे, प्रदीप सगट, संतोष माने, निलेश देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुहास चेळेकर, सुधाकर माने-देशमुख, सुर्यकांत मोहिते, सचिन चव्हाण, चेतन भोसले, आनंद साठे, विकास भांगे, रणजित गव्हाणे, संतोष शिंदे, अनिल पाटील, वासुदेव घाडगे, विशाल घोगरे, अभिजीत निचळ, संतोष सातपुते, भूषण काळे, उमेश खंडागळे, प्रकाश शेंडगे, मनोज साठे, गोपाल शिंदे, संजय पाटील, रविंद्र शेंडगे, महेंद्र माने, सुभाष तनमोर, शशि साळुंखे, विठ्ठल मलपे, संतोष शेळके, नितिन पाटील यांसह मराठा सेवा संघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच महिला कर्मचाऱ्यांमध्ये ममता काशेट्टी, वैशाली रंपुरे, शशिकला सुतार, गौरी कदम, ज्योती माळी, ज्योत्सना साठे, कृष्णा अधटराव, सिद्धेश्वर जक्का, शुभम खरे, सत्यजित कमळे, रोहित शिंदे, सागर शेंडगे यांनीही कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महताब शेख यांनी केले, तर आभार प्रदर्शन अविनाश गोडसे यांनी केले.
सोलापूर जिल्हा परिषदेत पार पडलेला हा इफ्तार सोहळा सामाजिक सलोखा, परस्पर आदर आणि बंधुभाव वाढवणारा उपक्रम ठरला.



