सोलापूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मार्डीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

राष्ट्रभक्ती रक्तदानातून' या संकल्पनेतून २२ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदानाचे आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मार्डीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

भाजप नेते इंद्रजीत पवार यांच्या पुढाकारातून ‘सेवा यज्ञ महारक्तदान संकल्प’; २२ जुलै रोजी नागरिकांना रक्तदानाचे आवाहन

सोलापूर : (उत्तर सोलापूर मार्डी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ‘राष्ट्रभक्ती रक्तदानातून’ या संकल्पनेवर आधारित ‘सेवा यज्ञ महारक्तदान संकल्प’ अंतर्गत बुधवारी, दि. २२ जुलै २०२६ रोजी मार्डी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत रुक्मिणी देवी बिगर शेती सहकारी पतसंस्था, मार्डी येथे पार पडणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत अधिकाधिक नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी केले आहे.

रक्तदान हे सर्वोत्तम जीवनदान मानले जाते. एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते. ही भावना जोपासत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

Oplus_16908288

या शिबिरात परिसरातील युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे आणि सामाजिक कार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन इंद्रजीत पवारकडून करण्यात आले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!