सोलापूर

श्री सिद्धेश्वर महायात्रा–२०२६ साठी सोलापूर सज्ज! आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक; सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर

श्री सिद्धेश्वर महायात्रा–२०२६ साठी सोलापूर सज्ज! आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक; सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापुरातील श्रद्धेचा महोत्सव असलेल्या श्री सिद्धेश्वर महायात्रा–२०२६ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने व्यापक आणि काटेकोर तयारी सुरू केली आहे. लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसह सुव्यवस्थित यात्रेचे आयोजन व्हावे, यासाठी प्रशासनाच्या सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आल्या आहेत.

या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समन्वय बैठक संपन्न झाली. या बैठकीत पोलीस प्रशासन, महापालिकेचे विविध विभाग, आरोग्य, अग्निशमन, वाहतूक, सार्वजनिक बांधकाम तसेच विद्युत विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत यात्रेच्या काळात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवणे, स्वतंत्र कंट्रोल रूमची स्थापना, कडक पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थापन, पार्किंगची योग्य सोय, तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज यंत्रणा उभारण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तात्पुरती रुग्णसेवा केंद्रे, अॅम्ब्युलन्स, डॉक्टर व परिचारिका, तसेच औषध साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय अग्निशमन दलाच्या अतिरिक्त गाड्या, अग्निसुरक्षा उपाययोजना आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात करण्यावरही भर देण्यात आला.

आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी बैठकीत स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, भाविकांची सुरक्षा आणि सोयीसुविधा हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून काम करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

श्री सिद्धेश्वर महायात्रा शांततेत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी, यासाठी सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!