राजकारण

प्रभाग २४ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल! बहुजन हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजू चव्हाण यांना उस्फूर्त जनसमर्थन

प्रभाग २४ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल! बहुजन हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजू चव्हाण यांना उस्फूर्त जनसमर्थन

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२६–२७ साठी प्रभाग क्रमांक २४ मधून ओबीसी जनरल (पुरुष) प्रवर्गात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य चे जिल्हाध्यक्ष श्री. राजू चव्हाण यांनी आपली दावेदारी अधिकृतपणे पक्की केली आहे. संघटनेच्या माध्यमातून आजवर केलेल्या भरीव सामाजिक कार्याच्या जोरावर ते सध्या सोलापूर शहरातील जनतेच्या पसंतीचे ‘एक नंबर’ उमेदवार मानले जात आहेत.

Oplus_16908288

राजू चव्हाण यांनी गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक कामाची वाटचाल केली आहे. संस्थापक अध्यक्ष श्री. दयानंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध भौतिक सेवा सुविधा, गरजू नागरिकांना मदत, सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका आणि स्थानिक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याच कामगिरीमुळे प्रभाग २४ मधून त्यांना मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद मिळत आहे.

विशेषतः विजापूर नाका व जुळे सोलापूर परिसरातील नागरिकांमध्ये राजू चव्हाण यांच्याबद्दल मोठा विश्वास दिसून येत असून, “ते निवडून यावेत, महानगरपालिकेत जाऊन थेट जनतेचे प्रतिनिधित्व करावे,” अशी अपेक्षा अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक राजकीय पक्षांनी उमेदवारीसाठी गळ घालण्याचा प्रयत्न केला; मात्र, बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आजवर केलेल्या कामाशी प्रामाणिक राहून त्यांनी कोणत्याही पक्षाची उमेदवारी न स्वीकारता अपक्ष लढण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

आज उमेदवारी अर्ज दाखल करताना परिसरात वाजत-गाजत, उत्साही वातावरणात भव्य जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी प्रभाग क्रमांक २४ मधील महिला व पुरुषांची उपस्थिती लक्षणीय होती. मोठ्या संख्येने जमलेल्या समर्थकांनी राजू चव्हाण यांच्या सामाजिक कार्याला दाद देत त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

एकंदरीत, कामाच्या जोरावर, संघटनात्मक ताकदीवर आणि जनतेच्या विश्वासावर राजू चव्हाण यांची उमेदवारी प्रभाग २४ मध्ये निर्णायक ठरणार असल्याची चर्चा सध्या सोलापूर शहरात जोर धरू लागली आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!