राजकारण

अक्कलकोट शहरात निकालाआधीच भाजपचा जल्लोष; फटाके, घोषणाबाजी व विजयी बॅनरबाजीने परिसर दणाणला

अक्कलकोट शहरात निकालाआधीच भाजपचा जल्लोष; फटाके, घोषणाबाजी व विजयी बॅनरबाजीने परिसर दणाणला

दणाणलाअक्कलकोट (प्रतिनिधी) : अक्कलकोट शहरात मतमोजणीचा अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्ष (भाजप) कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील प्रमुख ठिकाणी फटाके फोडून, घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. विशेषतः शहरात झालेल्या या जल्लोषामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या जल्लोषासोबतच नगराध्यक्ष मिलनदादा कल्याणशेट्टी आणि नगरसेवक अविनाश मडिखांबे यांच्या विजयी घोषणांचे मोठे बॅनर झळकताना दिसले. राजू भगळे मित्रपरिवाराच्या वतीने लावण्यात आलेल्या या बॅनरबाजीमुळे संपूर्ण परिसराचे लक्ष वेधले गेले. कार्यकर्त्यांमध्ये विजयाबाबत प्रचंड आत्मविश्वास दिसून येत होता.

निकाल जाहीर होण्यापूर्वीच झालेल्या या जल्लोषावर नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी उत्साहाचे स्वागत केले, तर काहींनी निवडणूक आचारसंहिता आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने अशा प्रकारच्या जल्लोषावर प्रश्न उपस्थित केले. वर्दळीच्या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी झाल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, मतमोजणीच्या अधिकृत निकालाकडे अक्कलकोट शहराचे लक्ष लागले असून, निकालानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत निकालाआधीच झालेला हा भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!